Dr Babasaheb Ambedkar Statue: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या तब्बल 125 फूट उंच पुतळ्याचं आज अनावरण होणार आहे. हैदराबाद (Hyderabad) येथे हा पुतळा उभारण्यात आलेला असून तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao) यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण होणार आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती आहे. हेच औचित्य साधत हैदराबादमध्ये आज मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे.
के चंद्रशेखर राव यांची नुकतीच राज्यातील मंत्री आणि अधिकाऱ्यांसह बैठक पार पडली. या बैठकीत बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उद्धाटनाबद्दल चर्चा करण्यात आली. तसंच नवीन सचिवालय इमारत संकुलाचे उद्घाटन आणि इतर समस्यांवरही चर्चा करण्यात आली. या बैठकीच आंबेडकरांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्याचा निर्णय घेण्यात आला.
1) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा भारतातील सर्वात उंच पुतळा असणार आहे. हा पुतळा राज्य सचिवालयाच्या शेजारी, बुद्ध पुतळ्याच्या समोर आणि तेलंगणा हुतात्मा स्मारकाशेजारी उभारण्यात आला आहे.
2) मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आंबेडकरांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतल्यापासून अंतिम रूप देण्यासाठी किमान दोन वर्षे लागली.
3) पद्मभूषण पुरस्कार प्राप्त पुतळ्याचे शिल्पकार 98 वर्षीय राम वानजी सुतार यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
4) अनावरण सोहळ्याला प्रत्येक मतदारसंघातील 300 लोकांसह सर्व 119 मतदारसंघातील 35,000 हून अधिक लोक उपस्थित राहतील याची व्यवस्था करण्यात आली आहे.
5) लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी सार्वजनिक रस्ते परिवहन महामंडळाच्या 750 बसेस चालवल्या जाणार आहेत.
6) हैदराबादला पोहोचण्यापूर्वी ५० किमीच्या आत विधानसभा संकुलात येणाऱ्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे.
7) एक लाख मिठाईची, 1.50 लाख ताकाची आणि पाण्याची पाकिटे जनतेसाठी उपलब्ध केली जाणार आहेत.