बाईकवर स्टंट करत होता, तोल गेला आणि... हेल्मेटमुळे बाचवलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. जे आपले मनोरंजन करतात.

Updated: Jan 18, 2022, 07:28 PM IST
बाईकवर स्टंट करत होता, तोल गेला आणि... हेल्मेटमुळे बाचवलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. जे आपले मनोरंजन करतात. परंतु येथे बरेच व्हिडीओ आपल्याला असे देखील पाहायला मिळतात, जे आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात. सोशल मीडियावर आपल्या अपघाताचे व्हिडीओ देखील पाहायला मिळतात, ज्यामध्ये एका छोट्या चुकीमुळे लोकं आपले प्राण गमावतात. हे असे व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असताता. सध्या सोशल मीडियावर असाच एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण स्टंट करत आहे. परंतु हा स्टंट करताना या तरुणाचा तोल बिघडतो आणि त्याचा अपघात होतो. हा खरोखरच खुप धक्कादायक व्हिडीओ आहे.

हा व्हायरल व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करण्यासोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हेल्मेटचे महत्त्व फक्त 6 सेकंदात जाणून घ्या.' या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्याने दुचाकी चालवत असतो. यादरम्यान तो अचानक कट मारण्याचा प्रयत्न करतो आणि आपली गाडी फिरवतो, ज्यामुळे त्याचा तोल जातो आणि हा तरुण खाली पडतो. तो ज्याप्रकारे खाली पडतो, त्यामुळे या तरुणाला गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. कदाचित या तरुणाचे प्राण देखील गेले असते.

परंतु या तरुणासोबत एक चांगली गोष्ट अशी घडली की, त्याने हेल्मेट घातले होते, ज्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. ज्यामुळे हेल्मेट प्राण वाचवण्यासाठी किती महत्वाचा आहे हे या तरुणाने चांगलेच पाहिले आहे.

हा व्हिडीओ गाडी चालवताना काळजी न घेणाऱ्या लोकांसाठी एक उदाहरण आहे. ज्यामध्ये लोकं स्वत: हे पाहू शकतात की, हेल्मेट एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी किती महत्वाचा आहे, त्यामुळे पुढच्या वेळेपासून तुम्ही देखील गाडी चालवताना संपूर्ण काळजी घ्या आणि विना हेल्मेट गाडी चालवू नका.

आपल्या सर्वांना माहित आहे की जगभरातील रस्ते अपघातात लोक आपला जीव गमावतात. भारतात दरवर्षी हजारो लोक रोड बाईक अपघातात आपला जीव गमावतात. यातील बहुतांश मृत्यू हेल्मेट न घातल्याने होतात. हेल्मेट घातल्याने डोक्याला गंभीर दुखापत टाळता येते. दुचाकी चालवताना हेल्मेटपेक्षा चांगले संरक्षण कवच नाही.