Video: रागात चालत आला पोलिसांसमोरच BJP आमदाराच्या कनाशिलात लगावली अन्...

Video BJP MLA SLAPPED In Front Of Cops: हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सध्या सोशल मीडियावर याच प्रकरणाची जोरदार चर्चा असून पोलिसांनी मध्यस्थी करुन दोघांना दूर केलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 9, 2024, 01:39 PM IST
Video: रागात चालत आला पोलिसांसमोरच BJP आमदाराच्या कनाशिलात लगावली अन्... title=
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे

Video BJP MLA SLAPPED In Front Of Cops: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी येथील अर्बन कोऑप्रेटीव्ह बँक प्रबंध समितीच्या निवडणुकीमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. बुधवारी बार असोसिएशनचे अध्यक्ष अवधेश सिंह यांनी याच प्रकरणावरुन झालेल्या राड्यादरम्यान भारतीय जनता पार्टीचे आमदार योगेश शर्मा यांना भररस्त्याच कानशीलात लगावली. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अवधेश यांनी आमदाराच्या कानशीलात लगावल्यानंतर आमदार समर्थकांनाही अवधेश यांना मारहाण केली. दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत या दोघांना दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळत आहे. 

नेमका वाद काय? 

भाजपाचे लखीमपूर खीरी येथील जिल्हाध्यक्ष सुनील सिंह आणि योगेश वर्मा यांची एक चिठ्ठी व्हायरल झाल्याने निवडणुकीवरुन वाद निर्माण झाला आहे. या चिठ्ठीमध्ये सदर निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र उपजिल्हाधिकारी संजय सिंह यांनी निवडणूक स्थगित केली जाणार नाही असं जाहीर केलं. यादरम्यान, मतदारांची यादी फाडण्यात आल्याचा दावाही करण्यात आला. या निवडणुकीची प्रक्रिया 14 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या बँकेमधील 12 हजार शेअर होर्डर्स मतदानाचा हक्क बजावमार आहेत. आज नामांकन भरण्यास सुरुवात होणार आहे. 10 तारखेपर्यंत नामांकन परत घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. 11 ऑक्टोबर रोजी मतदारांची यादी जाहीर केली जाणार आहे. तर 11 तारखेलाच निवडणूक चिन्हं काय असतील हे सुद्धा जाहीर केलं जाईल.

मात्र त्यापुर्वीच मतदानावरुन वाद निर्माण झाला असून निवडणूक पुढे ढलण्याचे प्रयत्न एका गटाकडून सुरु असल्याचे आरोप केले जात आहेत. मात्र उपजिल्हाधिकाऱ्यांनी संजय सिंह यांनी निवडणूक नियोजित वेळेत आणि निष्पक्षपणे पार पडेल असं सांगितलं आहे. आमदार योगेश वर्मा यांनी या निवडणुकीमध्ये गडबड असल्याचा दावा केला आहे.

..अन् कानशिलात लगावली

केल्या जाणाऱ्या दाव्यानुसार, आमदार योगेश वर्मा हे अवधेश सिंह यांना जाब विचारत त्यांच्या दिशेने तावातावाने चालत येत होते. अवधेश सिंह सुद्धा पोलीस संरक्षणात चालत येत असलेल्या योगेश यांच्या दिशेने चालत गेले आणि त्यांनी कोणाला काही कळण्याआधीच पोलिसांसमोरच योगेश यांच्या कानशीलात लगावली.

1)

2)

अखिलेश यांनीही केली टीका

योगेश वर्मा यांना कानशीलात लगावण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन खासदार अखिलेश यादव यांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे. "अन्याय हिंसेला जन्म देतो. कोऑप्रेटीव्ह निवडणुकीमध्ये लखीमपुरच्या भाजपा आमदाराने घातलेल्या गोंधळामुळे संतापलेले माजी सभापतीच्या पतीने जी मारहाण केली तो विषय चर्चेचा विषय ठरत आहे. अशी परिस्थिती निर्माण होणे लोकशाहीसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. निवडणुकीमध्ये गोंधळ घालणे हा भाजपाच्या रणनितीचा भाग झाला आहे, हे निंदनीय आहे," असं अखिलेश यांनी म्हटलं आहे.