Viral Video: 37,000 फूट उंचावर विमानात प्रवाशांचा 'तेरी आंख्या का यो काजल' गाण्यावर भन्नाट डान्स

Passengers Dancing in Flight on Haryanvi Song: हल्ली तऱ्हेतऱ्हेचे व्हिडीओज हे सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहतो, असाच एक व्हिडीओ (VIDEO) इन्टाग्रामवर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. यामध्ये महिला या सपना चौधरीच्या गाण्यावर डान्स (Sapna Choudhary) करताना दिसत आहेत. 

Updated: Apr 21, 2023, 05:22 PM IST
Viral Video: 37,000 फूट उंचावर विमानात प्रवाशांचा 'तेरी आंख्या का यो काजल' गाण्यावर भन्नाट डान्स title=

Viral Video of Dance in Plane: सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ अनेकदा व्हायरल (Viral Video) होत असतात. हे व्हिडीओज नेटकरी एन्जॉयही करताना आपण पाहतो. त्यातून आपल्यालाही अशावेळी नाचायचा मोह आवरत नाही. परंतु विमानामध्ये प्रवासासोबतच नाचगाणी करत (Dance Video) आपला 'मूड बनवणारे' ही काही कमी नाहीत. सोशल मीडियावर असे व्हिडीओज हे अनेकदा व्हायरल होताना दिसतात. अशा व्हिडीओखाली नेटकऱ्यांच्याही अनेकदा तूफान कमेंट्स पाहायला मिळतात. ज्ञान देणारे व्हिडीओज जितके व्हायरल होत नसतील तितके हे व्हिडीओज व्हायरल होताना आपण पाहतो. सध्या असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओची झलक सगळ्यांना वेड्यात काढते आहे.

हा व्हिडीओ सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो आहे. या व्हिडीओतून तुम्ही पाहू शकता की महिला आणि काही पुरूष सपना चौधरी नाचते त्या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. 'तेरी आंख्या का यो काजल' (Teri Akhyaka YO Kajal) या गाण्यावर ही मंडंळी तूफान डान्स करताना दिसत आहेत. या गाण्यावर नाचताना ही उत्साही मंडळीही अगदी हुबेहुब सपना चौधरीप्रमाणे (Sapna Choudhary) डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. त्यामुळे चाहत्यांच्या या व्हिडीओखालीही भन्नाट कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तुम्ही हा व्हिडीओ पाहिला नसेल तर हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही येड लागल्यावानी झाल्याशिवाय राहणार नाही. (viral video ladies dance on sapna choudhary song in plane 37,000 feet above netizens makes fun)

नेटकऱ्यांच्या तूफान कमेंट्स 

हा व्हिडीओ @anchor_jk या एका युझरनं इन्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यावेळी हा डान्स पाहून नेटकऱ्यांनीही कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एकानं लिहिलंय की, प्रवाशी खाली नाचत आहेत. तर हे गाणं ऐकून वर पायलटही नाचू लागला असेल आणि आता स्वर्गात पोहचलाही असेल. तर एकानं लिहिलंय की, सपना चौधरी लोकांना काय काय करायला लावते आहे असे डान्स पाहून कोणालाही धक्काच बसेल, हे खतरनाक नाही का? तर अनेक नेटकऱ्यांनी यावर कौतुकाच्याही (Funny Dance Video) कमेंट्स केल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओ व्हायरल 

या व्हिडीओला आत्तापर्यंत 37 हजार लाईक्स आले आहेत. आणि हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. सपना चौधरीचा 'तेरी आंख्या का यो काजल' हे गाणं 2018 साली प्रदर्शित झाले होते. या व्हिडीमध्ये महिला तूफान डान्स एन्जॉय करताना दिसत आहेत. तेव्हा तुम्हालाही हा व्हिडीओ पाहून आपलं हसू आवरता येणार नाही. हा व्हिडीओ 7 दिवसांपुर्वी पोस्ट करण्यात आला होता. ज्याची अजूनही चर्चा रंगली आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का?