बेधुंद होऊन मुलगी अंघोळ करीत होती; अचानक ते समोर आल्याने तिची भंबेरी उडाली

ती अंघोळ करीत असताना अचानक....

Updated: Jul 6, 2021, 07:15 PM IST
बेधुंद होऊन मुलगी अंघोळ करीत होती; अचानक ते समोर आल्याने तिची भंबेरी उडाली title=

हरिद्वार : अनेकदा आपण कामात इतके दंग होऊन जातो की, अचानक आपल्या आजुबाजूला काही घडले तर, आपण दचकून जातो. असाच काहीसा प्रकार एका मुलीबाबत घडला आहे. ती अंघोळ करीत असताना अचानक तिच्या बाजूला सापासारखी वस्तू आल्याने तिची भंबेरी उडाली.

सोशलमीडियावर वायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी बेधुंद होऊन गंगा नदीत अंघोळ करीत आहे. मागील दृश्याला पाहून अंदाज लावता येईल की, ठिकाण हरिद्वारचे आहे. अंघोळ करताना मुलगी आनंदाने नाचताना दिसतेय. परंतु तिला माहित नव्हते की काही सेकंदात वेगळंच काही घडणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by BaaM diaries (@baamdiaries)

मुलगी गंगा नदीत अंघोळ तिच्याजवळ सापासारखी गोष्ट तरंगताना दिसली आणि ती प्रचंड घाबरली. पाण्यात कुठे जावे तिला कळत नव्हते. तिने तिथून निसटायचा प्रयत्न केला. तर पुन्हा तेच घडले. 

खरेतर तिच्या जवळ तरंगनारी गोष्ट साप नव्हती. ते गवत होते. परंतु अचानक सापासारखी गोष्ट समोर आल्याने ती घाबरली. हा व्हिडिओ सोशलमीडियावर तुफान वायरल होत आहे.