प्रतिकूल परिस्थितीवर अशीही मात, कुणी विचार तरी केला होता का सायकलचा असाही वापर करता येईल? व्हिडीओ

हा जुगाड पाहून तुम्हीही म्हणाल वा रं गड्या! पाहा सायकलचा अनोखा वापर

Updated: Jul 6, 2021, 06:45 PM IST
प्रतिकूल परिस्थितीवर अशीही मात, कुणी विचार तरी केला होता का सायकलचा असाही वापर करता येईल? व्हिडीओ title=

थिरुथानी: अस्मानी संकट, कोरोना आणि त्यानंतर लॉकडाऊन एकामागे एक वाढणाऱ्या संकटातून बळीराजा थोडं वर येऊ पाहात असताना पुन्हा एक नवीन संकट ठाण मांडून समोर येतं. वाढणारी महागाई आणि लॉकडाऊननं कंबरडं मोडलं. कोरोनामुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातून बाहेर पडत आता पुन्हा एकदा शेतकरी पेरणी करत आहे.

कितीही भीषण संकट येऊदे बळीराजा धीरानं पुन्हा उभं राहातो. वेगवेगळे मार्ग काढून पुन्हा आपलं शेत पिकवतो हे आपण ऐकलंच आहे. ही परिस्थिती प्रत्यक्षातही पाहायला मिळाली आहे. एका शेतकऱ्यावर लॉकडाऊनमुळे बिकट परिस्थिती ओढवली. नांगर आणि जनावरही उरली नाहीत. तर शेती करायची कशी असा प्रश्न समोर उभा राहिला.

या प्रश्नावरही बळीराजा आणि त्याच्या मुलाने एक उपाय शोधला. जुगाड करून मुलाच्या सायकलीलाच नांगर बनवलं आणि शेतात सायकल फिरवली. शेतात सायकलनं केलेल्या नांगरणीचा हा जुगाड सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चिमुकल्याचं आणि शेतकऱ्याच्या जुगाडाचं कौतुक एकीकडे होत असताना काय भीषण परिस्थिती यांच्यावर ओढवली असावी याची कल्पनाच केलेली बरी. 

37 वर्षांच्या नागराज आणि त्याचा भावा पुश्तैनी आपलं शेत सांभाळतात. दरवर्षी इथे पारंपरिक पद्धतीनं शेती केली जाते. मात्र यावेळी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे शेतीसाठी घेतलेलं कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न होता. पण नागराज हिंमत हरला नाही. त्याने पुन्हा शेती करण्याचा निर्णय घेतला. 

नागराजच्या मुलाला तमिळनाडू सरकारकडून शाळेत जाण्यासाठी सायकल मोफत मिळाली होती. याच सायकलचा वापर त्याने नांगर म्हणून करायचं ठरवलं. नागराज त्याचा मुलगा आणि भाऊ तिघांनी मिळून पुन्हा शेत नांगरायला सुरुवात केली. सायकलनं शेत नांगरतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.