Viral Video : सोशल मीडियावर रिल्स बनवत प्रसिद्ध होण्यासाठी लोकं कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. विशेषत: युवा पिढीला तर रिल्सचं (Reels) व्यसनच लागलं आहे. कोणत्या ठिकाणी, कोणत्या कार्यक्रमात रिल्स बनवायचं याचं भानही ठेवलं जात नाही. आनंदाचं वातावरण असो की दु:खाचं वातावरण रिल्स बनवणाऱ्यांसाठी हा एक फक्त इव्हेंट असतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका मुलीने आपल्या आजोबांच्या मृत्यूनंतर अंतिम संस्काराला (Funeral) जाण्याआधी चक्क मेकअप करत व्हिडिओ बनवला. या व्हिडिओत मुलगी जे बोलतेय ते ऐकून आजोबा गेल्याचा हिला दु:ख झालंय की आनंद झालाय असा प्रश्न युजर्सना पडलाय.
आजोबा गेल्याचं दु:ख की आनंद
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक मुलगी मेकअप करताना दिसत आहे. मेक अप करताना ती म्हणतेय 'आता मी स्मशानभूमीत चालले आहे, Thank You Guys तुम्ही सर्वांनी माझ्या आजोबांसाठी प्रार्थना केली. त्यामुळे तुमचे सर्वांचे मनापासून आभार. अखेर आजोबा मेले, मी खूप खूश आहे. ते जिवंत असते तर त्यांना खूप वेदना सहन कराव्या लागल्या असत्या. आत मी त्यांच्या अंतिम संस्कारासाठी जात आहे. स्मशानभूमीत जात असल्याने मी जास्त मेक अप करत नाहीए. थोडासाच मेक अप करेन म्हणजे एकदम लाईट. मला लाईट मेकअपच आवडतो. भडक मेकअफ मला आवडत नाही. डीजेतही नाचायचं आहे. म्हणून जास्त श्रृंगार करत नाहीए, नाहीतर नाचता येणार नाही. माझ्या आजोबांना गजरा खूप आवडायचा. त्यामुळे मी विचार केला की अंतिम संस्कारात केसात गजरा माळून जावं. मी पहिल्यांदाच केसात गजरा माळला आहे. मी कशी दिसतेय, प्लीज कमेंट करुन सांगा आणि माझ्या आजोबांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करा, नरकात गेल्यावरही ते आनंदी राहोत आणि यापुढे आमच्यापासून दूर राहोत, Ok Guys आता मी निघतेय, तुम्ही सबस्क्राईब करा, byee guys, राधे राधे'
Narak mai bhi jagah nahi milegi isko pic.twitter.com/PAErSsOsOr
— Muskan (@Muskan_nnn) August 18, 2024
मुलीने असा व्हिडिओ का बनवला?
हा व्हिडिओ पाहून आजोबांच्या मृत्यूनंतरही ही मुलगी असा व्हिडिओ का बनवतेय, असा प्रश्न युजर्सना पडलाय. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक युजर्सने या मुलीला फटकारलं आहे. काही युजर्सने या मुलीचं मानसिक संतुलन बिघडलं असावं असं म्हटलं आहे. तर काही जणांनी हा व्हिडिओ केवळ प्रसिद्धीसाठी आणि सबस्क्राईबवर वाढवण्यासाठी केला असावा असं म्हटलं आहे. केवळ व्ह्यूज आणि लाईक वाढवण्यासाठी असे कंटेन्ट तयार केला जात असेल तर खरंच लाजीरवाणं आहे असं काही जणांनी म्हटलंय.
'Finally आजोबा मेले, मी खूप खूश आहे...' अंतिम संस्कारात जाण्यासाठी मेकअप करत मुलीने बनवला Video