Video : ती बाईकवरुन चालली होती, तो थांबला आणि तिचा तोल गेला...

Viral Video : सोशल मीडियावर कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल याचा नेम असतो. सध्या सोशल मीडियावर तरुणनीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

Updated: Nov 18, 2022, 03:25 PM IST
Video : ती बाईकवरुन चालली होती, तो थांबला आणि तिचा तोल गेला... title=
Viral Video Girl lost her balance and Falling in Drain CCTV Footage on Instagram nmp

Instagram Video : आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी खूप अनपेक्षित असतात. पुढच्या क्षणी तुमच्यासोबत काय घडेल याबद्दल कोणीही सांगू शकतं नाही.  असंच काहीशी एका तरुणीसोबत घडलं आहे. रस्त्यावरुन जाता जाता तो थांबला आणि तिचा तोल गेला...हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो (video viral on social media) आहे. 

आणि तरुणीचा तोल गेला...

सोशल मीडियावर तरुणीचा एक व्हिडीओ सगळ्यांचा लक्ष वेधून घेतं आहे. एक तरुणी नेहमीप्रमाणे घरातून निघते आणि स्कूटरवरुन रस्ताना जात असते. अचानक सिग्नल बंद होतो आणि तो बाईकवर जात असताना अचानक थांबतो. तीही मागे थांबते आणि तिचा तोल जातो...तिने कधी स्वप्नातही विचार केला नसेल असं तिचासोबत घडलं.

धक्कादायक व्हिडीओ

हो तिचा तोल जातो पण तरुणाला पाहून नाही. तर स्कूटरवरून तिचा तोल जातो आणि ती रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात (Manhole) पडते. सिग्नलवर असलेले इतर लोकंही हैराण होतात. क्षणात ती गटारच्या आत जाते (woman falls into manhole). नेमकं काय झालं हे कोणालाच कळतं नाही. 

'या' अपघाताला कोण जबाबदार?

अनेक वेळा गटारांना झाकण नसल्यामुळे न कळतं लोक त्या पडतात. अशा घटनांचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. अशाप्रकारच्या घटना अखेर कोण जबाबदार आहे, असा प्रश्न काय अनुत्तरीत असतो. प्रशासनाकडून वारंवार गटारांना झाकण लावण्याच्या तक्रारी गेल्यावरही त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेक नाहक बळी जातात. हा व्हिडीओ कुठला आहे याबद्दल काही कळलं नाही. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर johansuhandri या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.