सेल्फी काढण्याच्या नादात घडलं असं काही, तोंड काळं करुन आली तरुणी, पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमधील व्यक्ती जी चूक करतो. ती पाहून लोकांसमोर उदाहरण उभे राहते, जे पाहून लोकं पुन्हा अशी चुक करत नाहीत.

Updated: Dec 8, 2021, 04:36 PM IST
सेल्फी काढण्याच्या नादात घडलं असं काही, तोंड काळं करुन आली तरुणी, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडियाचे जग मजेदार व्हिडीओंनी भरलेले आहे. येथे दररोज हजारो लाखो नवनवीन व्हिडीओ शेअर आणि अपलोड केले जातात. जे आपलं मनोरंजन करतात. त्यातील काही व्हिडीओ इतके गंमतीदार असतात की, ते आपल्याला काही तरी शिकवून जाता. या व्हिडीओमधील व्यक्ती जी चूक करतो. ती पाहून लोकांसमोर उदाहरण उभे राहते, जे पाहून लोकं अलर्ट होतात.

सध्या एका मुलीचा असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. यामध्ये ती मुलगी नदीच्या काठावर सेल्फी घेत असते, पण त्यानंतर तिच्यासोबत असे काही घडते जे पाहून तुम्हाला तुमचे हसू आवरता येणार नाही.या मुलीचा हा मजेदार व्हिडीओ काही वेळात एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि हजारो लोकांनी त्याला लाईक केले आहे.

या व्हिडीओमध्ये निळ्या वनपीसमध्ये एक मुलगी नदीच्या काठावर उभी आहे आणि तिच्या हातात मोबाईल आहे. ती स्मार्टफोनवरून स्टाईलमध्ये सेल्फी घेत असते. दरम्यान, ती स्वत:ला कॅमेऱ्यात पाहून इतकी खुश झाली की, ती नाचायलाही लागली. मात्र, तिने हाय हिल्स घातली असल्याने तिचे नियंत्रण बिघडले आणि ती अचानक नदीत पडली.

ही नदी तशी फारशी खोल नाही. परंतु यामध्ये खराब पाणी आहे. ज्यामुळे पाण्यात पडल्याने मुलीचा मोबाईल आणि ड्रेस पूर्णपणे खराब झाल्याचे दिसून येत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या पेजवरही हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कधीचा आणि कुठचा आहे हे अद्याप कळू शकलेले नाही, मात्र नेटकऱ्यांनी यावर जोरदार कमेंट्स केल्या आहेत.