या दीड वर्षाच्या मुलाचे स्किल, पाहून तुम्ही काय म्हणाल? याचा हा व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका लहान मुलाचा जुगाड आहे. 

Updated: Oct 22, 2021, 06:34 PM IST
या दीड वर्षाच्या मुलाचे स्किल, पाहून तुम्ही काय म्हणाल? याचा हा व्हिडीओ एकदा पाहाच title=

मुंबई : कधीकधी असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे पाहून आपण आश्चर्यचकित होतो. हे व्हिडीओ आपले मनोरंजन करतात आणि आपल्याला हसवतात देखील. काही व्हिडीओ तर इतके मजेदार असताता की, तुम्ही त्याला 2 ते 3 वेळा पाहिलंत तरी तुमचं मन भरत नाही. तर सोशल मीडियावर आपल्याला जुगाडाचे व्हिडीओ देखील पाहायला मिळतात, जे खूपच भारी असतात.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका लहान मुलाचा जुगाड आहे. तसे पाहाता हा आपल्यासाठी जुगाड नाही, परंतु तो त्या लहान मुलासाठी जुगाडापेक्षा कमी नाही.

या व्हिडीओत एका दीड वर्षाचा मुलगा आहे. जो त्याच्या घराच्या वरती बाजूला उभा असतो आणि तेथे खाली शिडी लागलेली असती तो मुलगा त्या शिडीवरुन असा काही खाली उतरतो की, तुम्हाला त्याच्या या युक्तीला दाद द्यावीशी वाटेल.

सहसा, जिथे इतक्या लहान वयाची मुले चार पावलेही नीट चालू शकत नाहीत, तिथे हा दीड वर्षांचे मूलगा सुमारे 15 फूट वर छतावर चढलेला असताना स्वत: असा भरभर खाली उतरला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओला पाहिल्यानंतर अनेक लोकांना यामुलाचे आश्चर्य वाटले. हा व्हिडीओ सोशल व्हायरल झाल्यानंतर याला 76 हजारांपेक्षा जास्त Views मिळालए आहेत. तर सोशल मीडिया युजर्सनी देखील या मुलाच्या चपळाई आणि चथुराईचे कौतुक केले आहे. एका युजरने कमेंट करताना लिहिले की, हा मुलगा ज्या वेगेने खाली आला, त्या वेगाने लिफ्ट देखील येत नाही. तर दुसऱ्या एका युजरला हा लहान मुलगा आर्मी लवर असावा असे सांगितले.