वराच्या मित्रांकडून नववधूला अजब भेट, बॉक्स उघडल्यावर सगळ्यांनाच बसला धक्का, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर आपल्या नेहमीच काही ना काही व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपले मनोरंजन करतात.

Updated: Feb 2, 2022, 01:55 PM IST
वराच्या मित्रांकडून नववधूला अजब भेट, बॉक्स उघडल्यावर सगळ्यांनाच बसला धक्का, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडियावर आपल्या नेहमीच काही ना काही व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपले मनोरंजन करतात. लोकांना असे व्हिडीओ पाहायला खुप आवडतात. ज्यामुळे लोकं तासन तास सोशल मीडियावर असतात. सध्या लग्नाचा सिझन सुरू असल्यामुळे आपल्या सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.

लग्न म्हटलं की, मजा मस्करी ही येतेच. वधु-वरांसोबत त्यांचे मित्र आणि नातेवाईक मस्करी करत असतात आणि त्याच्याशी संबंधीत अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहे. तुम्हाला तर हे माहितच आहे की, लग्नात लोकांकडून भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. कधीकधी काही लोक गंमतीने विचित्र भेटवस्तू देतात. ते उघडून पाहिल्यावर धक्कादायक बाबी समोर येतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

यामध्ये वधू-वर स्टेजवर बसलेले दिसत आहेत. तेव्हा त्यांच्या एका मित्राने एका मोठ्या डब्यात भेट वस्तु दिली. मोठा बॉक्स पाहून वधू खूप उत्साहित झाली आणि तिने स्टेजवरच ते उघडण्याचा निर्णय घेतला.

वधूने भेटवस्तू उघडताच तिला आश्चर्य वाटले, कारण एका बॉक्समध्ये आणखी एक बॉक्स होता. यानंतर त्या बॉक्समध्ये एक पॅकेट होते, ते उघडल्यावर त्याला दुसरे पॅकेट दिसले. अशा प्रकारे तिने अनेकवेळा पॅकेट उघडले. त्यानंतर खुप वेळा गिफ्ट रॅप्ट उघडल्यानंतर अखेर नववधूच्या हाती गिफ्ट लागले. जे पाहून सगळ्यांना आपलं हसू आवरलं नाही.

आम्ही हे खात्रीने सांगु शकतो की, तुम्हाला देखील हे गिफ्ट पाहिल्यावर हसू आवरणार नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शेवटी जेव्हा नववधू पॅकेट उघडले तेव्हा ती विचारात पडली. कारण तिला पॅकेटमध्ये सर्जिकल मास्क मिळाला. हे गिफ्ट पाहून नववधू सोबतच उपस्थीत सगळ्याच लोकांना खुप हसायला आलं. कारण एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये फक्त 2 मास्क होते, हे फारच आश्चर्यकारक होते.

हे गिफ्ट देण्यामागे त्यांच्या मित्राचा एकच हेतू होता की, कोरोनाच्या काळात लग्नाच्या वेळीही मास्क घालावा. हा व्हिडीओ घंटा नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला.