पवन सिंहच्या भोजपुरी गाण्यावर महिलेचा भन्नाट डान्स, व्हिडीओने युजर्सलाही लावले वेड

कुठेही काही कार्यक्रम असला की, मनोरंजनासाठी यांना आमंत्रण दिलं जातं.

Updated: Sep 27, 2021, 06:10 PM IST
पवन सिंहच्या भोजपुरी गाण्यावर महिलेचा भन्नाट डान्स, व्हिडीओने युजर्सलाही लावले वेड title=

मुंबई : भोजपुरी किंवा हरीयाणवी डान्स म्हटला की आपल्या डोळ्यासमोर उभी रहाते ती, सपना चौधरी आणि आर.सी. उपाध्याय ज्यासर्वत्र खूप गाजतात देखील. कुठेही काही कार्यक्रम असला की, मनोरंजनासाठी यांना आमंत्रण दिलं जातं. यासाठी या डान्स महिला लाखात फीस देखील घेतात. या दोघींचे व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात.

परंतु या दोघींना मागे टाकण्यासाठी आता आणखी एक व्यक्ती उतरली आहे. सोशल मीडिया एक असं प्लॅटफॉर्म आहे ज्यावरती तुम्ही तुम्हाला हव्या त्या गोष्टी शेअर करु शकता. सोशल मीडियाने लोकांना असं एक प्लॅटफॉर्म दिलं आहे जेथे लोकं आपल्यातील टॅलेंट शेअर करताता आणि तुमच्याकडे खरंच जर काही टॅलेंट असेल तर लोकं त्याला उचलून धरताता, ज्यामुळे अशा लोकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताता.

सध्या सोशल मीडियावर असाच एका सुंदर महिलेचा भोजपूरी डान्स व्हायरल होत आहे, ज्याने सोशल मीडियावर आग लावली आहे. या महिलेने पवन सिंहच्या "रात झकझोरी में तोर दिया चुरी" या गाण्यावर ठुमके लावले आहेत. ज्यामुळे सोशल मीडीयावर तिच्या डान्सचीच चर्चा आहे.

या व्हिडीओवर लोकांनी कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे. सोशल मीडियावर व्हायर झालेल्या व्हिडीओत या महिलेने निळ्या साडीत आग लावली आहे. लोकं कमेंटमध्ये या महिलेची सपना चौधरी आणि आर.सी. उपाध्याय यांच्याशी तुलना केली आहे. तसेच काही यूजर्सने या महिलेने सपना चैधरीला ही मागे टाकले आहे असे म्हटले आहे.