फक्त एक कचोरी ५ जणांची सरकारी नोकरी घेऊन गेली...

Viral video on social media : सोशलमीडियावर काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे राजस्थानमधील रेल्वेच्या पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Updated: Feb 21, 2022, 11:29 AM IST
फक्त एक कचोरी ५ जणांची सरकारी नोकरी घेऊन गेली... title=

अजमेर : सोशलमीडियावर काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अनेकदा सोशल मीडियावर कॉमेडी तसेच संवेदनशील व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतू काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे राजस्थानमधील रेल्वेच्या पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

 

राजस्थानच्या अलवरमधील एका लोको पायलटचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत रेल्वे क्रॉसिंगवर एक लोको पायटल कचोरीसाठी ट्रेन थांबवत असल्याचं समोर आलं आहे. 
 
ट्रेन येताच एक व्यक्ती कचोरी घेऊन फाटकात उभी होती.  त्यावेळी लोको पायलटनं ट्रेनचा वेग कमी करून कचोरीची पिशवी घेतली.आणि पुढे निघून गेला. 
 
या लोको पायलटच्या कचोरी प्रेमामुळे रेल्वे क्रॉसिंग अधिक वेळ बंद ठेवावी लागते...त्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला. 
 
याचा व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेत स्टेशन अधीक्षकासह 5 जणांना निलंबित केलं आहे.