मुंबई : मे महिन्याला सुरुवाला झाली आहे. ज्यामुळे उष्णता देखील बरीच वाढली आहे. लोक उष्णतेपासून स्वत:ला वाचवण्यासाठी नवनवीन पर्यायांकडे वळत आहेत. ज्यामध्ये लोक एक्ट्रा पंखा, कुलर किंवा एसी घरी आणत आहेत, ज्यामुळे त्यांना थंडावा मिळेल. परंतु ज्या लोकांचं घर उंचावर असतं किंवा टॅरेसच्या अगदी खाली असतं अशा लोकांना एसी किंवा पंख्यासारख्या पर्यायांच्या काहीही उपयोग होत नाही. कारण त्यांच्या घराचे छत जास्त गरम होते, ज्यामुळे त्यांना उष्णतेपासून लवकर सुटका मिळत नाही. परंतु तुम्हाला माहितीय, एका व्यक्तीने असा काही पर्याय शोधून काढला आहे, ज्यामुळे तुम्ही उंचावर देखील राहात असाल, तरी तुम्हाला उष्णता फारशी जाणवणार नाही.
एका व्यक्तीने दावा केला आहे की, त्याने अशा पेंटचा शोध लावला आहे, जो घराच्या छतावर लावल्याने घराचे तापमान 10 अंशांनी कमी करू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गाझियाबादमधील एका कंपनीने मेक इन इंडिया अंतर्गत नवीन प्रकारचा पेंट तयार केला आहे. शनिवारी शारदा विद्यापीठातील इंडियन इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (आयआयए) प्रदर्शनात रंगाचा हा नवीन प्रकार दाखवण्यात आला.
विनायक इंडस्ट्रीजचे उद्योजक मोहित अग्रवाल यांनी दावा केला आहे की, त्यांच्या कंपनी समर सीलने हे पेंट बनवले आहे.
त्यांनी एक प्रयोग देखील करुन दाखवला आहे. जिथे सामान्य दगडाचे तापमान 44 डिग्री सेल्सियस होते, तिथे पेंट केलेल्या दगडाचे तापमान 33 डिग्री सेल्सियस होते. इतकंच नाही तर हा पेंट लोखंडी पत्र्यावर लावला, तर तापमान 8 अंश सेल्सिअसने कमी होईल, असा दावाही कंपनीने केला आहे. या पेंटचे आयुष्य 7 ते 8 वर्षे आहे.
कंपनीच्या कामगिरीबद्दल कंपनीला पुरस्कार देखील देण्यात आला आहे. या पेंटची किंमत सुमारे 18 रुपये प्रति चौरस फूट आहे आणि या पेंटचा रंग पांढरा आहे.