DSP प्रेयसीसोबत करत होता रोमान्स, अचानक पत्नीने दार ठोठवलं, पुढे जे घडलं...

Viral News : बायको मुलं माहेरी गेली म्हणून या DSP महाशयाने आपल्या प्रेयसीला घरी बोलवलं. दोघे घरात रोमान्स करत असताना दरवाजा ठोठावला गेला. बाहेर बायको होती पुढे जे घडलं...  

नेहा चौधरी | Updated: Jun 9, 2024, 03:39 PM IST
DSP प्रेयसीसोबत करत होता रोमान्स, अचानक पत्नीने दार ठोठवलं, पुढे जे घडलं... title=
viral news

Trending News : गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधामधील घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यात सोशल मीडियाच्या जगात अशा घटना जगापासून लपवून राहत नाही. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डीएसपीचं प्रेम प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. या महाशयाची पत्नी मुलांना घेऊन गावी होती. त्याचा फायदा घेत या डीएसपीने आपल्या डॉक्टर प्रेयसीला घरी बोलावलं. पण त्यांना कल्पना नसताना अचानक बायकोने दार ठोठवलं. त्यानंतर जे काही घडलं त्यामुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. 

ही घटना राजस्थानमधील बस्तीमधील आहे. पतीला गर्लफेंडसोबत रंगेहात पकडल्यावर तिने तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या संसार आणि विश्वाला तडा गेला होता. तिने संतापाच्या भरात डीएसपीच्या डॉक्टर गर्लफ्रेन्डला बेदम मारहाण केली. 

धक्कादायक म्हणजे घरातील या महाभारत पोलीस स्टेशनला पोहोचलंय. डीएसपीने आपल्या मैत्रिणीला मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे केलीय. धक्कादायक म्हणजे डीएसपीने स्वत: गर्लफ्रेंडला मारहाण केली असा आरोप होतोय. शिवाय डीएसपी दोन महिला कॉन्स्टेबलला बोलावून मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे. यामुळे हे नेमकं काय प्रकरण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान जयपूरमधील डीएसपी विनय चौहान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर जयपूर पोलिसांनी हे प्रकरण तपासासाठी बस्तीमध्ये वर्ग केलाय. मात्र, तपासावर परिणाम होऊ नये म्हणून एसपींनी हे प्रकरण सिद्धार्थनगर जिल्ह्यात वर्ग केलाय. 

हेसुद्धा वाचा - दर महिन्याला दुबईला जायची तरुणी, CISF ला आला संशय; एक्स-रे पाहिला तर प्रायव्हेट पार्टमध्ये...; सगळेच चक्रावले

सोबतच आरोपी सीओला तातडीने पदावरून हटवण्यात आलंय. त्यांच्या जागी आता सीओ रुधौली यांना सदर सर्कलची जबाबदारी सोपवण्यात आलीय. राजस्थानमधील राजपत्रित महिला डॉक्टर आणि डीएसपी विनय चौहान यांच्यात गेल्या 5 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते, अशी माहिती समोर येते. 26 मे रोजी सीओ विनयने त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी बस्तीमधील शासकीय निवासस्थानी बोलावलं होतं. त्याचवेळी सीओची पत्नीही घरी आली आणि पतीला प्रेयसीसोबत पाहिल्यानंतर तिचा संयम सुटला अन् तिने मारहाण केली. 

हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने डीजीपी स्तरावरून त्यावर लक्ष ठेवलं जातंय. तपासावर परिणाम होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रकरणाचा तपास एसपी सिद्धार्थनगर यांच्याकडे सोपवण्यात आलाय. सध्या एसपी बस्ती गोपाल चौधरी यांनी तात्काळ आरोपी सीओ विनय चौहानला त्यांच्या पदावरून हटवलंय. तपास अहवालानंतर डीएसपींवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.