Viral news : चोरीचा एक अतिशय विचित्र आणि अजब प्रकार समोर आला आहे. या चोरीचा प्रकार ओटीएसमध्ये पब्लिकेशन ऑफिसर असलेल्या महिलेच्या घरातून चोरट्यांनी 50 तोळे सोनं लंपास केले. पण दुसऱ्याच दिवशी चोरट्याने महिलेच्या पर्समध्ये 35 तोळे सोन्याचे दागिने परत ठेवलं. 25 ऑक्टोबरला घडलेल्या या प्रकारानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे. ओटीएसमध्ये पब्लिकेशन ऑफिसर असलेल्या महिलेने तंत्र मंत्राच्या आधारे आपले सोनं परत मिळवलंय. नेमकं काय आहे प्रकरण जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. (Virla news After looting 50 tolas of gold the thieves returned it the next day Because of Tantra mantras)
ही घटना 25 ऑक्टोबरला प्रकाशन अधिकारी डॉ. अमृत कौर यांच्या घरी चोरी झाली होती. त्या घराबाहेर कुठेतर गेल्या होत्या. घरी परत आल्यानंतर घरात कपाटातील सामान विखुरलेले त्यांना दिसलं. त्यानंतर त्यांनी तपासणी केली असता कपाटात ठेवलेले 50 तोळं सोन्याचे दागिने आणि सुमारे 50 हजार रुपये चोरी गेल्याच त्यांचा लक्षात आलं. यानंतर त्यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली आणि पोलिसांनी तपास सुरू केला.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संशयितांचा शोध सुरू केला असून तीन जणांना संशयावरून ताब्यात घेतलं. मात्र, त्यांनी चोरीची कबुली दिली नाही आणि या तिघांनी चोरी केल्याचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नसल्याने आता कसं करणार या विचारात असताना. पण संशयाच्या आधारे पोलिसांनी त्या चोरट्यांना पडकलं. झालं असं की, पोलिसांनी महिलेला पोलीस ठाण्यात बोलावले. यावेळी महिला असे काही बोलली की चोरटे घाबरले आणि दुसऱ्या दिवशी 35 तोळे सोन्याचे दागिने परत केले.
पोलीस ठाण्यात चोरट्यांना घाबरवण्यासाठी महिलेने त्यांना तंत्रमंत्राद्वारे चोरी कोणी केली हे शोधून काढल्याचे सांगितले. त्यांनी तंत्र-मंत्राद्वारे चोरट्यांचे चेहरे पाण्यात पाहिल्याचे संशयितांना सांगितलं. यानंतर तिन्ही चोरटे घाबरले आणि त्यांनी पोलीस ठाण्यातच कैफियत मांडण्यास सुरुवात केली. पोलिसांकडे पुरावे नसतानाही चोरट्यांना सोडावे लागले, मात्र महिलेच्या बोलण्याने चोरटे इतके घाबरले की त्यांनी दागिने परत केले. दुसऱ्या दिवशी सकाळी महिलेला तिच्या बागेत एका पर्समध्ये 35 तोळे सोन्याचे दागिने सापडले. अशा प्रकारे महिलेने चोरांचा शोध लावला.