Trending Video : आपल्या मुलांना चांगल वळण लागावं, ते चुकीच्या मार्गावर जाऊ नये, अशी प्रत्येक पालकांची (parents) इच्छा असते. त्यामुळे आई - वडील (mother - father Video) कायम मुलांच्या गोष्टींवर लक्ष ठेवून असतात. आपल्या मुलाला (child Video) कुठल्याही चुकीच्या गोष्टींचं व्यसन (addiction) तर लागतं नाही ना याकडे पालक बारकाईने लक्ष देतात. सिगारेट (cigarettes), दारु (alcohol) हे आरोग्यासाठी घातक असून त्यामुळे जीव जातो. त्यामुळे मुलांना याचं व्यसन लागू नये याची आई वडील काळजी घेत असतात. पण जर एखाद्या मुलाने कुठल्या वाईट व्यसनाला बळी पडला असेल तर, त्यानंतर आईने त्याला रंगेहात पकडले मग आई काय करणार? अशावेळी आई मुलाला तो परत असं कृत्य करु नये म्हणून शिक्षा (punishment) देते. पण ती शिक्षा किती मोठी असावी. एका आईने मुलाला दिलेल्या शिक्षेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) होतो आहे. तो पाहून अंगावर काटा येतो आणि एकच प्रश्न पडतो मुलाला चुकीची शिक्षा देताना आई इतकी कठोर होऊ शकते का?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, तो मुलगा रडतोय...ओरडतोय...पण आई काही केल्या ऐकतं नव्हती. तिने मुलाचा हात पकडून ठेवलायचं दिसून येतं आहे. तर दुसऱ्या हाताने ती मुलाच्या चेहऱ्यावर लाल तिखट चोळताना दिसत आहे. या मुलाची चुक एवढीच आहे की त्याने सिगारेट ओढली होती. मुलांना शिक्षा केलीच पाहिजे पण किती आणि कुठली? शिक्षा अशी असावी की मुलांनी परत ते कृत्य करता कामा नये. पण या आईचं हे कृत्य मात्र संतापजनक आहे. पोटच्या पोरासोबत आईचं असं कृत्य हे आश्चर्यकारक आहे. (Viral Can a mother be so harsh when punishing her child wrongly Rubbed red chili boy face Video on Social media)
धक्कादायक गोष्ट म्हणजे आईने शेजारी एका महिला हाक मारली आणि तिला मुलाचे दोन्ही हात धरायला सांगितले. ती महिला जेव्हा त्या मुलाचे दोन्ही हात धरते तेव्हा ती निदर्यी आई मुलाच्या तोंडाला लाल तिखट चोळताना दिसतं आहे. त्यानंतर तो मुलगा वेदनेने ओरडतोय...रडतोय आक्रोश करतो पण आईला काही फरक पडतं नाही आहे. मुलाने सिगारेट ओढली या रागासमोर तिला काही दिसतं नव्हतं.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @gharkekalesh नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे.
Son-Mom kalesh (Mother Rubbed Red Chilli In the Eyes of Son for Smoking)pic.twitter.com/HI0CmK28lq
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 2, 2022
हा व्हिडिओ पाहून नेटकरी आईच्या कृत्याचा निषेध करत आहेत. तर काही यूजर्स समर्थन करताना दिसतं आहेत.