Gold Price Today : सोने - चांदीच्या नव्या किंमती जाहीर, खरेदी करण्याची सुवर्णसंधी

सोन्या-चांदीच्या दरात गुंतवणूक करणे आवश्यक

Updated: Aug 26, 2021, 02:09 PM IST
Gold Price Today : सोने - चांदीच्या नव्या किंमती जाहीर, खरेदी करण्याची सुवर्णसंधी  title=

मुंबई : डॉलरच्या तुलनेत आज सोने-चांदीचा दर स्थिर आहे. सुरूवातीला रुपये डॉलरच्या तुलनेत 13 पैशांची वाढ झाली आहे. या दरम्यान सोन्याच्या दरात 16 रुपयांनी घसरण झाली आहे. आता सोन्याचा दर 10 ग्रॅम करता 47163 रुपये आहे. डिसेंबरमधील सोन्याच्या दरात 51 रुपयांनी घसरण झाली असून आता दर 47304 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा ऑक्टोबर करार रात्री 09.30 वाजता 0.02 टक्के किंचित वाढीसह 47,188 रुपयांवर बंद झाला. सप्टेंबरमधील चांदी वायदा 0.13 टक्क्यांनी कमी होऊन 63,192 रुपये प्रति किलोवर व्यवहार करीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्यांनी घसरून 1,788.17 डॉलर प्रति औंस आणि अमेरिकन सोन्याचे वायदे 1,789.80 डॉलरच्या घसरणीसह बंद झाले.

सोने जाणार 50 हजारांच्या पार 

लवकरच सोने 50,000 रुपयांपर्यंत पोहोचेल. अशा परिस्थितीत गुंतवणुक करणं फायदेशीर ठरेल. गुंतवणूकदार YOLO मेटलमध्ये गुंतवणूक करू शकतात. त्याच वेळी जर एखाद्या गुंतवणूकदाराने आधीच सोन्यात गुंतवणूक सुरू ठेवली असेल, तर आता ती धारण करणे फायदेशीर ठरू शकते. जगातील सर्वात मोठा गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड एसपीडीआर गोल्ड ट्रस्टचे होल्डिंग सोमवारी सुमारे 0.5 टक्क्यांनी घटून सुमारे 1006 टनांवर आले. गेल्या आठवड्याच्या शेवटी ते सुमारे 1,011 टन होते.

सोन्याची शुद्धता तपासणे 

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकार बनवले आहे. बीआयएस केअर ऍपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या ऍपद्वारे आपण केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही तर आपण त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रार देखील करू शकता.