नवी दिल्ली : विजय केशव गोखले हे देशाचे नवे परराष्ट्र सचिव असणार आहेत. १९८१च्या IFS बॅचचे अधिकारी असलेले गोखले सध्या परराष्ट्र मंत्रालयात आर्थिक संबंध सचिव पदावर कार्यरत आहेत.
पुढल्या दोन वर्षांसाठी गोखले यांची परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलीये. बीजिंग इथं भारताचे राजदूत राहिलेले गोखले यांचा चिनविषयक संबंधांमध्ये चांगला अभ्यास आहे. विद्यमान परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांची मुदत २८ जानेवारीला संपणार आहे. त्यानंतर गोखले पदभार स्वीकारतील.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिलीये. गोखले यांनी चीनबरोबरच जर्मनी, हाँगकाँग, हानोई, न्यूयॉर्क इथं भारतीय दुतावासांमध्ये काम केलंय.