अजगराने वृद्धाच्या गळ्याभोवती फास आवळला अन्...; धक्कादायक Video आला समोर

Python Tightly Wraps Itself Around Mans Neck: हा संपूर्ण घटनाक्रम एका कालव्यामध्ये घडल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आधी ही व्यक्ती उभी असते नंतर अजगर आपला विखळा आवळतो तशी या व्यक्तीची हलचाल मंदावताना दिसते.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 28, 2023, 10:59 AM IST
अजगराने वृद्धाच्या गळ्याभोवती फास आवळला अन्...; धक्कादायक Video आला समोर title=
या व्हिडीओला हजारोंच्या संख्येनं प्रतिक्रिया मिळाल्या आहेत

Python Wrapped Around The Neck: जगभरामध्ये सापाच्या अनेक प्रजाती आहेत. अनेक साप तर इतके विषारी आहेत की त्यांच्या विषाच्या एका थेंबाने अनेकांचा मृत्यू होऊ शकतो. मात्र सर्वच साप दंश करुन मारतात असं नाही काही साप केवळ ताकदीच्या जोरावर शिकार करतात. सोशल मीडियावर रोज सापांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडीओ पाहून खरोखरच अंगावर काटा येतो. असाच एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पुन्हा चर्चेत असून अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. 

तो जमीनीवर पडला...

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. हा व्हिडीओ एका पाणी नसलेल्या कालव्यातील असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक मोठ्या आकाराचा अजगर एका वयस्कर व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि मानेभोवती वेटोळा मारुन बसल्याचं दिसत आहे. हा अजगर त्याचा विळखा अधिक अधिक मजबूत करत असतानाच या व्यक्तीला गुदमरल्यासारखं झालं आणि तो जमीनीवर पडला. मात्र ही व्यक्ती या अजगराशी झुंज देत असताना अन्य दोघेजण त्याच्या मदतीला आले.

मदतीला आले तरुण, एकाने दगड उचलला...

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये अजगर जसा आपला फास आवळतो तसा हा वृद्ध जमीनीवर पडतो. अनेकदा प्रयत्न करुनही हा अजगर या व्यक्तीला सोडत नाही. उलट तो त्याची पकड अधिक घट्ट करत असल्याने वयस्कर व्यक्ती गदमरु लागली. तितक्यात 2 जण या व्यक्तीच्या मदतीला आले. ते स्वत:ला वाचवत या अजगराला वयस्कर व्यक्तीच्या गळ्याजवळून दूर करण्याचा प्रयत्न करत होते. या व्हिडीओमध्ये अनेकजण आरडाओरड करताना दिसत आहेत. एक तरुण अजगराची शेपूट पकडून दूर करण्याचा प्रयत्न करतो. दुसरा मुलगा या अजगराला मारण्यासाठी दगडही उचलतो. मात्र नंतर तो हा दगड फेकून देत हातानेच अजगराला दूर करण्याचा प्रयत्न करु लागतो. या व्यक्तीचं पुढे काय झालं, अजगराने त्याच्या गळ्याभोवतीचा विळखा सोडला का याबद्दलची माहिती मिळू शकलेली नाही.

व्हिडीओ पाहूनच गुदमरल्यासारखं होतंय...

हा व्हिडीओ 5 जुलै रोजी शेअर करण्यात आला असून त्याला 28 हजरांहून अधिक लाइक्स आहेत. व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या असून अशा वेळी मदत तरी कशी करावी हा मोठा प्रश्न आहे असं एकाने म्हटलं आहे. अन्य एकाने स्वत:चा जीव धोक्यात टाकून या वयस्कर व्यक्तीची मदत करणाऱ्या दोन्ही तरुणांचं कौतुक केलं आहे. अन्य एकाने हा व्हिडीओ पाहतानाच गुदमरल्यासारखं झाल्याचं प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं आहे.