स्वत:ला काश्मीरचा पोलीस म्हणवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ वायरल

जम्मू - काश्मीर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल असल्याचं सांगत एका व्यक्तीनं एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलंय.

Updated: Sep 6, 2017, 04:54 PM IST
स्वत:ला काश्मीरचा पोलीस म्हणवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ वायरल title=

श्रीनगर : जम्मू - काश्मीर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल असल्याचं सांगत एका व्यक्तीनं एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलंय.

सोशल मीडियातून त्याचा हा राजीनामा वायरल होताना दिसतोय. या व्हिडिओत या व्यक्तीनं आपली ओळख केवळ रईस अशी करून दिलीय. जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या हिंसेचा निषेध करत त्यानं हा राजीनामा दिल्याचं म्हटलंय. 

'इथं दररोज रक्तपात पाहणारा माझा अंतरात्मा मी एक पोलीस म्हणून योग्य आहे किंवा नाही, असा प्रश्न विचारू नये म्हणून मी पोलीस विभागातून राजीनामा दिलाय' असं त्यानं या व्हिडिओत म्हटलंय. यापुढे आपण लोकांची सेवा करणार असल्याचं त्यानं म्हटलंय. 

परंतु, पोलिसांनी मात्र या व्हिडिओची कोणत्याही प्रकारे पृष्टी केलेली नाही... रईसनं केलेल्या दाव्यांची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

 

'झी २४ तास' या व्हिडिओची कोणत्याही प्रकारे पृष्टी करत नाही.