गलवानच्या विरपुत्रांसाठी गाण्यातून श्रद्धांजली, हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू

'गलवान के वीर' असं हे गाणं तुमच्या अंगावर शहारा येईल 

Updated: Jun 17, 2021, 12:07 PM IST
गलवानच्या विरपुत्रांसाठी गाण्यातून श्रद्धांजली, हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू title=

मुंबई : गलवान खोऱ्यातील संघर्षाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या दिवशी भारतीय सेनेने एक गाण रिलीज केलं. या गाण्यातून त्यांनी गलवान खोऱ्यातील संघर्षात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली आहे. लडाख क्षेत्रातील गलवान संघर्षात चिनच्या सैनिकांना अतिशय सडेतोड उत्तर देणाऱ्या जवानांना या गाण्यातून श्रद्धांजली वाहिली आहे. 'गलवान के वीर' असं हे गाणं आहे. 

गीताचे बोल आणि व्हिडिओ गलवान, लडाख क्षेत्राच्या आजूबाजूच्या परिसरात हे गाणं चित्रित करण्यात येणार आहे. व्हिडिओत भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर आणि टँक देखील दिसत आहेत. गलवान खोऱ्यातील संघर्षात शहीद झालेल्या जवानांना भारतीय सेनेने या गाण्यातून आदरांजली दिली आहे.  

गायक हरिहरन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हरिहरन यांनी भारतीय सेना आणि जवानांचे आभार मानले आहेत.

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या संघर्षानंतर दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहचला होता. तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर चर्चा सुरू आहे. चर्चेच्या जवळपास ११ फेऱ्या झाल्यानंतरही परिस्थिती 'जैसे थे'च आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, भारतीय सुरक्षा दलांनी (Indian Security Forces) पूर्ण लडाख (Ladakh) क्षेत्रात स्वतःची स्थिती मजबूत केली आहे. पायाभूत सुविधांची उभारणी, संपर्क यंत्रणा वाढवणं आणि परकीय देशाच्या सैन्याचा सामना करण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात करणं आदींचा त्यात समावेश आहे.