ट्रिपल तलाकसोबतच समान नागरी कायदाही लागू करा: प्रविण तोगडीया

'ट्रिपल तलाक'बाबत न्यायालयाने कायदा निर्माण करून तो लागू करण्याचा आदेश दिला. या कायद्याप्रमाणेच देशात समान नागरी कायदाही लागू करा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रविण तोगडीया यांनी केली आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 22, 2017, 08:35 PM IST
 ट्रिपल तलाकसोबतच समान नागरी कायदाही लागू करा: प्रविण तोगडीया title=

नवी दिल्ली : 'ट्रिपल तलाक'बाबत न्यायालयाने कायदा निर्माण करून तो लागू करण्याचा आदेश दिला. या कायद्याप्रमाणेच देशात समान नागरी कायदाही लागू करा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रविण तोगडीया यांनी केली आहे.

दरम्यान, या मागणीसोबतच एकावेळी अनेक मुले जन्माला घालण्यावरही बंदी घालायला हवी, असे मतही तोगडीया यांनी व्यक्त केले. न्यायालयाने ट्रिपल तलाकबाबत दिलेल्या निर्णयावर प्रतिक्रीया देताना तोगडीया बोलत होते.

या वेळी बोलताना तोगडीया यांनी, 'मुस्लिम महिला आणि देशातील नागरिकांना न्याय देण्यासाठी सरकारने हा कायदा पारीत करणे गरजेचे होते. तसेच, हा कायदा पारीत करताना सरकारने समान नागरी कायदाही लागू करावा', असे तोगडीया म्हणाले.