नवी दिल्ली : वेंकय्या नायडू हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. एनडीएकडून थोड्याच वेळात उपराष्ट्रपतीपदाच्या नावाची घोषणा होणार आहे.
भाजप मुख्यालयात भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरच भाजपचे पदाधिकारी उपस्थित आहेत. अमित शहा संध्याकाळी साडेसात वाजता उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा करणार आहेत.
५ ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ जुलै आहे. तर अर्ज मागे घ्यायची तारीख २१ जुलै आहे. यूपीएनं उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली आहे.