Crime News : उत्तराखंडच्या (Uttarakhand News) पिथोरडगडमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पत्नी, बहिण, आई, वहिनी आणि वृद्ध महिलेची हत्या करण्यात करण्यात आली आहे. उत्तराखंडच्या (Uttarakhand Crime) पिथौरागढ (Pithoragarh) येथील कनरा भागातील बुरसम गावात चार महिलांच्या हत्येमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. ज्या कुटुंबातील तीन महिलांची गळा चिरून हत्या करण्यात आली त्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी भीतीने गाव सोडले आहे. या हत्याकांडानंतर आरोपीनेदेखील आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
उत्तराखंडच्या बुरसम गावात हे हत्याकांड घडले आहे. चांटोला टोक येथे राहणाऱ्या संतोष राम कुमार याने 12 मे रोजी सकाळी पत्नी चंद्रकला हिचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर शेजारच्या घरातील ताई हेमंती देवी, वहिणी रमा देवी आणि बहीण माया देवी यांची हत्या केली. चार खून करून आरोपी संतोष राम कुमार फरार होता. पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत होते मात्र तो सापडला नाही. त्यानंतर सोमवारी आरोपी संतोष राम याचा मृतदेह रामगंगेच्या काठावर झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.
भारत-नेपाळ सीमेपर्यंत शोध
छोलिया नृत्य करणाऱ्या संतोषने त्याची पत्नी, मावशी, वहिनी आणि मेव्हणीचा गळा चिरून खून केला. शुक्रवारी पहाटे 5 वाजता हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांच्या शोध पथकाला शुक्रवारी रात्री 9.35 वाजता सर्वांचे मृतदेह सापडले. या हत्याकांडानंतर पोलीस श्वास पथकासह ड्रोनची मदत घेून भारत-नेपाळ सीमेवर आरोप संतोष रामचा शोध घेत होते. आरोपीच्या शोधात 70 हून अधिक पोलीस कर्मचारी चार दिवसांपासून बरसुमच्या आजूबाजूच्या जंगलात तपास करत होते.
आईला दिली हत्याकांडाची माहिती
शनिवारी पोलिस अधीक्षक लोकेश्वर सिंह यांनी सांगितले की, सुरुवातीला संतोषने हत्येनंतर आईला फोन केल्याचे समोर आले आहे. चौघांच्या हत्येनंतर संतोष रामने आईला फोन करून आपले काम पूर्ण केले असून आता आत्महत्या करणार असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून त्याचा फोन बंद येत होता. बुरसम हत्याकांडात हत्या केल्यानंतर मारेकरी संतोष राम हातात रक्ताने माखलेले धारदार शस्त्र घेऊन फरार झाला होता. आता पोलीस या प्रकरणाचाही तपास करत आहेत.
कशामुळे केली हत्या?
आरोपी संतोष रामला त्याच्या मामाचा मुलगा प्रकाश याच्यावर प्रचंड राग होता. संतोष आणि प्रकाश दोघेही छोलिया नृत्य करायचे. काही वर्षांपूर्वी संतोषचा पाय मोडला होता, तेव्हापासून त्याला नाचता येत नव्हते. संतोषला छलिया नृत्य करता येत नसल्याने प्रकाशवर त्याचा राग होता. यावरुनच दोन्ही कुटुंबातील महिलांमध्ये वाद व्हायचे. शुक्रवारी जेव्हा संतोष रामने चार महिलांची हत्या केली तेव्हा प्रकाश घरी नव्हता.
दरम्यान, संतोष रामने वारंवार भांडण व धमकावल्याची तक्रार यापूर्वीही प्रकाशने केली होती. पोलिसांनी सांगितले की, तो धारदार शस्त्रे घेऊन घराभोवती फिरत असे.