देहरादून : एक मोठी तितकीच वाईट बातमी समोर आली आहे. भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. भाविकांनी भरलेली बस ही 200 मीटर खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळाली आहे. दुर्देवाने यात काही भाविकांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. (uttarakhand bus carrying 28 pilgrims from panna district in mp fell into a gorge near damta in uttarkashi district)
तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु झालं आहे. देहरादूनमध्ये भाविकांनी भरलेली बस 200 मीटर खोल दरीत कोसळली.
चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचं म्हटलं जातंय. हा अपघात सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दामता रिखांव खड्डजवळ सांगण्यात येत आहे. या अपघातात 25 भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होतीय. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झालाय. घटनास्थळी रेस्क्यू टीम दाखल झालीय.
मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील भाविक हे मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील असल्याचं समजतंय. तसेच बसमध्ये 28 भाविक असल्याचं समोर आलंय.
#Update | Uttarakhand: 15 bodies have been recovered so far after a bus carrying 28 pilgrims fell into a gorge near Damta in Uttarkashi district: DGP Ashok Kumar
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 5, 2022