'गदर-2'ची स्टोरी सांगणाऱ्या तरुणाला घरात घुसून मारलं; धक्कादायक Video आला समोर

Man Beaten For Narrating The Story Of Gadar 2: मारहाण झालेली व्यक्ती चित्रपट पाहून आल्यानंतर स्वत:च्या घराबाहेर शेजारच्या घरातील मुलांना 'गदर-2'ची कथा सांगत होता. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने यावर आक्षेप घेतला आणि त्यामधून आधी बाचाबाचीला सुरुवात झाली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 18, 2023, 12:17 PM IST
'गदर-2'ची स्टोरी सांगणाऱ्या तरुणाला घरात घुसून मारलं; धक्कादायक Video आला समोर title=
या प्रकरणामध्ये एफआयआरही दाखल करण्यात आली आहे

Man Beaten For Narrating The Story Of Gadar 2: अभिनेता सनी देओलची प्रमुख भूमिका असलेल्या 'गदर-2' चित्रपटाला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट सनी देओलचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तसेच 'गदर-2' चित्रपट हा 2023 मध्ये सुरुवातीच्या काळात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. शाहरुख खानच्या 'पठाण'नंतर एवढं यश मिळालेला 'गदर-2' हा दुसरा चित्रपट ठरला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तर या चित्रपटाने एका दिवसात 50 कोटींहून अधिकची कमाई केली. आठवड्याभरात या चित्रपटाने एकूण 284.58 कोटींची कमाई केली आहे.

आधी हटकलं, मग वाद झाला, पण तो निघून गेला

एकीकडे तिकीटबारीवर अभिनेत्री अमिषा पटेल आणि सनी देओल यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट अनेक विक्रम मोडीत काढत असताना या चित्रपटासंदर्भातील एक विचित्र बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील बुदाऊनमध्ये ही घटना घडली आहे. चित्रपट पाहून बाहेर आल्यानंतर चित्रपटाची कथा सांगणाऱ्या एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव अमित कुमार गुप्ता असं आहे. अमित कुमार 'गदर-2' पाहून आला आणि शेजारी राहणाऱ्या मुलांबरोबर चर्चा करत होता. अमित या मुलांना चित्रपटाची कथा सांगत असतानाच तौसीफ नावाच्या व्यक्तीने रस्त्यावरुन जाताना ही चर्चा ऐकली. या चर्चेतील काही शब्दांवर आक्षेप घेत तौसीफने अमितला हटकले. अमितने आपण केवळ चित्रपटाची कथा मुलांना सांगतोय असं म्हटलं. या दोघांमध्ये थोडा वाद झाला आणि तौसीफ तिथून निघून गेला.

टोळक्याला घेऊन पुन्हा आला अन्...

मात्र काही वेळाने तौसीफ 10 जणांच्या टोळीला घेऊन अमित गुप्ताच्या घरी पाहोचला आणि त्याला मारहाण करु लागला. सोशल मीडियावर या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

"माझ्या घरात शिरले अन्..."

या मारहाणीसंदर्भात अमित गुप्ताने 'टाइम्स नाऊ'ला माहिती दिली. "मी माझ्या घरासमोर उभा राहून मुलांबरोबर गदर-2 बद्दल बोलत होते. त्यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या तौसीफ नावाच्या व्यक्तीने मला हटकलं आणि मी मुस्लिमांबद्दल का बोलतोय असं विचारलं. त्यावर मी त्याला तुमचं याच्याशी काही देणंघेणं नाही असं सांगितलं. त्यानंतर ती व्यक्ती मला शिवागाळ करु लागली आणि तिने माझी कॉलर पकडली. त्या व्यक्तीने माझे कपडे फाटले. अन्य एकाने मध्यस्थी करुन वाद सोडवला. मात्र मी घरी गेल्यानंतर तौसीफ 10 ते 12 जणांना घेऊन आला आणि बळजबरीने माझ्या घरात शिरला. माझी आणि छोटा भाऊ घरात होते. त्यांनी माझ्या घरात घुसून मला मारलं आणि वस्तूंची मोडतोड केली," असं अमित गुप्ताने सांगितलं. या प्रकरणी कलम 323, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.