Amroha Nonveg Controversy : उत्तर प्रदेशमधल्या अमरोहा (Amroha) इथल्या एका खासगी शाळेतील तिसरीतल्या एका विद्यार्थ्याने डब्यात चिकन बिर्याणी (Chicken Biryani) आणली होती. यावरुन शाळेच्या प्रिन्सिपलने मुलाला शाळेतून बाहेर काढलं. आता या प्रकरणाचे पडसाद उमटू लागले आहेत. मुलाच्या आईने प्रिन्सिपलचा व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल केला आहे. यावर जिल्हा प्रशासनाने व्हायरल व्हिडिओच्या तपासाचे आदेश दिले असून तीन सदस्यांची समिती गठित केली आहे. समितीच्या अहवालानंतर पुढची कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय.
प्रिन्सिपलचा संतापजनक व्हिडिओ
तिसरीतल्या विद्यार्थ्याने डब्यात चिकन बिर्याणी आणल्यानंतर त्याची तक्रार शिक्षिकेने शाळेच्या प्रिन्सिपलकडे केली. प्रिन्सिपलने विद्यार्थी आणि त्याच्या आईला आपल्या केबिनमध्ये बोलावलं आणि त्याच्या आईला आणि मुलाला सुनावलं. मुलाच्या आईने याचा व्हिडिओ बनवला असून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. प्रिन्सिपलने विद्यार्थ्यावर चक्क धर्मांतर करत असल्याचा आरोप केला आहे. प्रिन्सिपलचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत प्रिन्सिपल संतापजनक वक्तव्य करताना दिसतोय 'तुमचा मुलगा डब्यात नॉनव्हेज घेऊन येतो आणि वर्गातील मुलांना मुसलमान बनवेन असं म्हणतो, मी अशा मुलांना शिकवू शकत नाही, जी मोठी होऊन आमचीच मंदिरं तोडतात'
विद्यार्थ्याच्या आईने हा व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल केला आहे. शिवाय विद्यार्थ्याला वर्गात कोंडून ठेवल्याचाही आरोप केला आहे. यावर स्पष्टीकरण देत शाळेने मांसाहर आणण्यावर बंदी आहे असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या सात मिनिटांच्या या व्हिडिओचे पडसाद उमटू लागले आहेत. जिल्हा प्रशासानाने प्रकरणाचं गांभार्य लक्षात घेत व्हिडिओच्या तपासाचे आदेश दिले आहेत. यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. अमरोहा पोलिसांनाही तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.
वायरल वीडियो उत्तर प्रदेश जनपद अमरोहा का बताया जा रहा है इस टीचर ने बच्चे को बंधक बनाया और मंदिर तोड़ने का आरोप लगाया बच्चे का स्कूल से भी नाम काट दिया गया पता चलने पर परिजनों ने स्कूल पहुंचकर हंगामा किया ये पुलिस की भी धमकी देता नजर आया@Uppolice @dgpup @UPGovt @amrohapolice pic.twitter.com/LzSS3Imaur
— Amjad Ali (@LiveNewsAmjad) September 5, 2024
अमरोहाचे जिल्हाधिकारी राजेश कुमार त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. पण व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या आधारे तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. तपासानंतर याप्रकरणी कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.