नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील शाहजहांपुर जिल्ह्यात एका युवतीचं अपहरण करुन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मदी खिरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गात येणाऱ्या एका गावातील २० वर्षीय तरुणीचं अज्ञातांनी अपहरण केलं.
२१ डिसेंबर रोजी सायंकाळी रस्त्यावरुन जात असताना या तरुणीचं चार जणांनी अपहरण केलं. अपहरण केल्यानंतर तिला कारमधून एका अज्ञात ठिकाणी नेलं. त्याठिकाणी चार आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे.
बलात्कार केल्यानंतर आरोपींनी पीडित तरुणीला शेतात सोडलं आणि त्या ठिकाणाहून पळ काढला. सुत्रांच्या मते, पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार शाहरुख, नसीमुद्दीन, अरुण नावाच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी युवतीचे वडील हत्येच्या प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. तर, आरोपी तरुण हे या हत्याकांडातील साक्षीदार आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून आरोपींचा शोध सुरु आहे.