भारत दौऱ्यावर आलेल्या ट्रम्प यांचा पाकिस्तानला इशारा

भारत दौऱ्यात अमेरिकेच्य़ा राष्ट्राध्यक्षांचं मोठं वक्तव्य

Updated: Feb 24, 2020, 02:58 PM IST
भारत दौऱ्यावर आलेल्या ट्रम्प यांचा पाकिस्तानला इशारा title=

अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौऱ्यावर असताना पाकिस्तानला इशारा दिला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं की, आपले देश इस्लामिक दहशतवादाचे शिकार ठरले आहेत. ज्याच्या विरोधात आपण लढत आहोत. अमेरिकेने कारवाई करत इराक आणि सीरीयामधून ISIS ला संपवलं. आम्ही अल बगदादीचा खात्मा केला. आम्ही दहशतवादाच्या विरोधात कडक कारवाई करत आहोत. पाकिस्तानवर ही दबाव टाकला आहे. पाकिस्तानला दहशतवादाच्या विरोधात कारवाई करावीच लागेल. प्रत्येक देशाला स्वतःला सुरक्षित करण्याचा अधिकार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, मी उद्या पंतप्रधान मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहोत. ज्यामध्ये अनेक करारावर चर्चा होणार आहे. भारत आणि अमेरिका डिफेंसच्या क्षेत्रात पुढे जात आहे. आम्ही भारताला सगळ्यात खतरनाक अशा मिसाईल आणि हत्यारं देऊ. अमेरिका-भारत दोघं ही एकत्र दहशतदाच्या विरोधात लढू. इस्लामिक दहशतवादाच्या विरोधात अमेरिका लढत आहे.

ट्रम्प यांनी म्हटलं की, भारतात आज हिंदू, जैन, मुस्लीम, शीखसह अनेक धर्माचे लोक एकत्र राहतात. येथे अनेक भाषा बोलल्या जातात. तरी देखील येथे लोकं एका शक्ती प्रमाणे राहतात. अमेरिकेत मुळच्या भारतीय लोकांनी विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी सरकारने केलेल्या कामांचा यावेळी उल्लेख केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, भारत-अमेरिका आज मैत्रीसोबतच व्यापारामध्ये देखील पुढे जात आहे. मी आणि मेलानियाने आज महात्मा गांधी आश्रमाला भेट दिली. जेथे गांधींनी दांडीयात्रा सुरु केली होती. आज आम्ही ताजमहलला देखील जाणार आहोत.