UPSC परीक्षा वेळापत्रकाप्रमाणेच, 'या' तारखेला होणार पूर्व परीक्षा

 आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व निर्धारित केलेल्या वेळेत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. 

Updated: Feb 11, 2021, 10:19 AM IST
UPSC परीक्षा वेळापत्रकाप्रमाणेच, 'या' तारखेला होणार पूर्व परीक्षा     title=

मुंबई: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता UPSC परीक्षेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट येत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी सनदी अधिकारीपदाची पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय नियमित वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षा होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी सनदी अधिकारीपदाची पूर्व परीक्षा येत्या 27 जून रोजी होणार आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व निर्धारित केलेल्या वेळेत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. 

पूर्व परीक्षेसाठी निश्चित केलेल्या तारखेलाच ही परीक्षा होणार आहे. परीक्षा केंद्रावर येणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देण्यात आलेल्या गाइडलाइन्सचं पालन कऱणं गरजेचं आहे. तर मुख्य परीक्षेबाबतही लवकरच माहिती देण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. 

UPSCच्या परीक्षा वेळासंदर्भात सविस्तर अधिसूचना लवकरच यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळापत्रक आणि तारखा पाहता येणार आहेत. परीक्षेसाठी अगदी काही दिवस उरल्यानं विद्यार्थ्यांनी जोमानं अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. मुख्य आणि पूर्व परीक्षांचं वेळापत्रक UPSCच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात येणार आहे.