Indian Army Officer Recruitment UPSC CDS-1 Notification 2023 Out : वयाच्या अमुक एका टप्प्यावर आल्यानंतर आपल्याला नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, याबाबतचं चित्र स्पष्ट होतं. यातही अनेकांचा कल असतो तो म्हणजे देशसेवेकडे. आपण ज्या देशाचे नागरिक आहोत, त्या देशाप्रती आपलीही काहीतरी जबाबदारी असते याची जाण ठेवत देशसेवेत योगदान देता येईल अशी एखादी नोकरी करण्याकडे अनेकांचाच कल असतो. अशा तरुण- तरुणींसाठी नोकरीची (Job opportunities) सुवर्णसंधी चालून आली आहे. जिथं, त्यांना थेट अधिकारी पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे.
upsc.gov.in या संकेतस्थळावर यूपीएससीच्या घेतल्या जाणाऱ्या सीडीएस परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून सैन्यदल (Defence), हवाईदल आणि नौदलात (indian navy) अधिकारी म्हणून काम करण्याची संधी पदवीधर तरुण-तरुणींना मिळणार आहे. देशसेवा आणि चांगल्या पगाराची नोकरी असे दोन लक्ष्यभेद या एका नोकरीतून करण्यात येणार आहेत. (UPSC CDS 1 Exam online application process defence airforce navy latest job news)
यूपीएससीमार्फत (UPSC) प्रत्येक वर्षी दोन वेळा सीडीएस परीक्षेचं आयोजन केलं जातं. या प्रक्रियेअंतर्गत यावेळी एकूण 341 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. लेखी परीक्षा (Written Exams), सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती आणि वैद्यकीय तपासणी अशा विविध टप्प्यात ही प्रक्रिया पार पडेल. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी upsc.gov.in किंवा upsconline.nic.in या संकेतस्थळांचा वापर करावा. उमेदवारांना 10 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज भरल्यानंतर पहिली परीक्षा 16 एप्रिल 2023 ला असेल. परीक्षेच्या तीन आठवड्यांपूर्वी इच्छुक उमेदवारांना ई- प्रवेश पत्रक दिलं जाईल.
- भारतीय सैन्यदल अकादमी, देहरादून - 100 सीट/पद
- भारतीय नौदल अकादमी, एझिमाला - 22 सीट/पद
- वायुदल अकादमी, हैदराबाद - 32 सीट/पद
- अधिकारी प्रशिक्षण अकादमी, चेन्नई (मद्रास) 116वी एसएससी (पुरुष) (एनटी) - 170 सीट/पद
- अधिकारी प्रशिक्षण अकादमी, चेन्नई (मद्रास) 30 वी एसएससी महिला (एनटी) - 17 सीट/पद
- IMA आणि OTA (अधिकारी प्रशिक्षण अकादमी) चेन्नई, येथे प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी असावी.
- भारतीय नौदल अकादमीत प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी/ इंजिनियरिंगची पदवी असावी.
- भारतीय वायुदलामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवारानं 10+2 मध्ये Physics आणि Maths विषयांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनियरिंगची पदवी घेतलेली असावी.
- सर्वप्रथम upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या.
- तिथे युपीएससी आणि ऑनलाईन अर्जासाठी OTR वर जा आणि APPLY च्या लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी फॉर्म भरून आवेदन शुल्क भरा आणि आवश्यक कागदपतत्रांची पूर्तता करा.
- जवळीच परीक्षा केंद्राची निवड करून अर्ज पुढे पाठवा.
- फॉर्म डाऊनलोड करून भविष्यामधील वापरासाठी त्याची एक प्रिंटेड प्रत स्वत:कडे ठेवा.