Viral Video: रामलीलामध्ये शिव भूमिका करणाऱ्या कलाकाराचा मृत्यू, Video व्हायरल

UP Ramlila: भगवान शिवची आरती सुरु असताना तो कलाकार स्टेजवर अचानक कोसळला.

Updated: Oct 12, 2022, 02:19 PM IST
Viral Video: रामलीलामध्ये शिव भूमिका करणाऱ्या कलाकाराचा मृत्यू, Video व्हायरल title=
up ramlila Video Death on Stage Trending viral on Social media nmp

Video Death on Stage: रामलीला आरतीचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा अंगावर काटा येतो आहे. रामलीलेत भगवान शिवाची भूमिका करणाऱ्या कलाकाराचा (actors ) अभिनय करताना मृत्यू झाला. या घटनेचा लाइव्ह व्हिडीओ (Live Video) समोर आला आहे. 

काय घडलं नेमकं

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) जौनपूरच्या (Jaunpur) रामलीला ( ramlila) करताना भगवान शिवची आरती सुरु असताना तो कलाकार स्टेजवर अचानक कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, भगवान शिवाची भूमिका साकारणाऱ्या रामप्रसाद पांडे याला हृदयविकाराचा झटका (heart attack) आला आणि त्याचा मृत्यू झाला. (up ramlila  Video Death on Stage Trending viral on Social media nmp)

हे प्रकरण मच्छलीशहर तहसील भागातील बालासिन (Balasin) गावातील आहे. गावातील रहिवासी असलेला राम प्रसाद (Ram Prasad) उर्फ ​​छब्बन पांडे असं या व्यक्तीचं नाव असून ते 45 वर्षांचे होते. राम प्रसाद हे आदर्श रामलीला समितीचा सदस्य होते. या रामलीलामध्ये ते भगवान शिवची भूमिका साकारायचे. सोमवारी रात्रीही ते गावातील रामलीलेत शंकराच्या रूपात वावरत होते. यादरम्यान अचानक स्टेजवर पडून त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गेल्या काही महिन्यांमध्ये असे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले आहेत, ज्यामध्ये लोक डान्स करताना किंवा काही प्रकारची अॅक्टिव्हिटी करताना अचानक मृत्यूला सामोरे जात आहेत. त्यातच हृदयविकाराचा झटका हे जवळजवळ सर्व मृत्यूंचे कारण असल्याचं सांगितलं जातंय.