विद्यार्थिनीला रिक्षातून खेचून हत्या करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; मोबाईलसाठी केला होता हल्ला

UP Crime :  उत्तर प्रदेशात एका विद्यार्थिनीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारांला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं आहे. पहिल्यांदा पळून जाण्यात यशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडून त्याला ठार केले आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 30, 2023, 02:34 PM IST
विद्यार्थिनीला रिक्षातून खेचून हत्या करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; मोबाईलसाठी केला होता हल्ला title=

Crime News : उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) एका विद्यार्थीनीच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगाला एन्काऊंटरमध्ये (encounter) ठार केलं आहे. गाझियाबाद पोलिसांनी कुख्यात दरोडेखोर जितेंद्र उर्फ ​​जीतूचा खात्मा केला आहे. 25,000 रुपयांचे बक्षीस असलेल्या गुन्हेगाराने एका विद्यार्थिनीचा मोबाईल फोन लुटण्यासाठी तिला ऑटोतून बाहेर खेचलं होतं. या घटनेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. अखेर पोलिसांनी या गुन्हेगाराला एन्काऊंटरमध्ये ठार केलं आहे. जितेंद्रवर गंभीर कलमांतर्गत 11 गुन्हे दाखल होते. रविवारी पोलिसांकडून तपासणी सुरु असताना आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला होता. त्यानंतर झालेल्या चकमकीत जीतूला ठार करण्यात आलं.

गाझियाबाद येथील एबीईएस महाविद्यालयाची बीटेक करणारी विद्यार्थिनी कीर्ती सिंहकडून मोबाईल लुटणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेश पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे. रात्री उशिरा झालेल्या चकमकीत ​​जीतूचा मृत्यू झाला. मसुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगानाहर ट्रॅकवर झालेल्या चकमकीत तो जखमी झाला होता, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या चकमकीत एक पोलीसही जखमी झाला आहे. 27 ऑक्टोबर रोजी बीटेकची विद्यार्थिनी कीर्ती सिंह रिक्षाने जात असताना दोन आरोपींनी तिला लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये जीतू देखील होता. मोबाईल लुटण्याच्या प्रयत्नात कीर्ती सिंह ऑटोमधून पडली होती. 

एनएच-9 वरील उद्योग कुंजजवळ दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनी कीर्ती (19) हिचा रविवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुचाकीस्वार दरोडेखोरांनी त्याचा मोबाईल चोरण्यासाठी त्याला ऑटोमधून ओढून नेण्याचा प्रयत्न केला होता. रस्त्यावर पडल्याने त्याचे डोके फुटले. डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली, मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. ही घटना 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास पन्नापुरी, हापूर येथील रवींद्रची मुलगी आणि 

पीडित कीर्ती सिंह ही गाझियाबाद येथील एबीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाची बीटेक प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. 27 ऑक्टोबर रोजी दुपारी ती तिची मैत्रिण दीक्षासोबत घरी जात होती. त्यावेळी दुचाकीवरून मागून आलेल्या दोन चोरट्यांनी रिक्षातूनच कीर्तीचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यावर त्याने तिचा हात धरून बाहेर ओढले. ती रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाली. चोरट्याच्या हाती मोबाईल लागला आणि ते पळून गेले. दीक्षा आणि ऑटो चालकाने किर्तीला रुग्णालयात दाखल केले होते. रस्त्यावर पडल्याने तिचे डोके फुटले होते. डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली. मात्र तिचे रविवारी संध्याकाळी निधन झाले.

शनिवारी रात्री मसुरी पोलिसांनी आरोपी बोबिल आणि जीतूला घेरले होते. यादरम्यान दोघांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंच्या गोळीबारात बोबिल जखमी झाला. पायाला गोळी लागल्याने तो जमिनीवर पडला. पोलिसांनी त्याला लगेच पकडले. मात्र जितू घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर 29 आणि 30 ऑक्टोबरच्या मध्यरात्री मसुरी पोलीस तपास करत होते. त्यावेळी समोरून बाईकवरून आलेल्या दोन जणांना पोलिसांनी पाहिलं. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पुन्हा पळ काढला आणि गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जीतू जखमी झाला. जीतूला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला.