पुढे जाण्याची शर्यत ठरली जीवघेणी... भाविकांना घेऊन जाणारी ट्रॉली पुलावरुन कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू

Shahjahanpur Accident : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे ट्रॅक्टर-ट्रॉली पुलावरून कोसळल्याने किमान सहा जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांनी बाहेर काढत जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांसाठी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.

Updated: Apr 15, 2023, 05:25 PM IST
पुढे जाण्याची शर्यत ठरली जीवघेणी... भाविकांना घेऊन जाणारी ट्रॉली पुलावरुन कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू  title=

Shahjahanpur Accident : उत्तर प्रदेशातच्या (UP News) शहाजहांपुरमध्ये (Shahjahanpur) शनिवारी भीषण अपघात (Accident News) घडलाय. प्रवाशांनी भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली पुलावरुन खाली कोसळल्याने मोठा अपघात झाला. एएनआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार या अपघातात आतापर्यंत सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर 31 लोक जखमी झाले आहेत. 40 पेक्षा अधिक प्रवासी या ट्रॉलीमधून प्रवास करत होते. त्याचवेळी हा अपघात झाला आणि ट्रॉली थेट पुलावरुन खाली कोसळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह शहाजहांपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 

या अपघातात महिला आणि लहान मुलांसह सुमारे सहा लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासोबतच अनेक जण जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या ट्रॉलीमधून प्रवास करणारे सर्व भाविक गररा नदीत पाणी भरण्यासाठी आले होते.  तिल्हार पोलीस ठाण्याच्या बिरसिंगपूर गावाजवळ ही धक्कादायक घडली आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. शहाजहांपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. शाहजहांपूरमधील या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे.

नेमकं काय घडलं?

अजमतपूर गावात आयोजित भागवत कथेसाठी लोक शनिवारी दुपारी गररा नदीतून दोन ट्रॉलीने पाणी घेण्यासाठी गेले होते. पाणी भरल्यानंतर सर्वजण गावाकडे निघाले हो. दोन्ही ट्रॉली पुढे जाण्यासाठी वेगात जात होत्या. आळीपाळीने दोन्ही ट्रॉलीचालक एकमेकांना मागे टाकत होते. मात्र एका ट्रॉली चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती पुलावरून खाली पडली. या ट्रॉलीमध्ये सुमारे 42 लोक होते. या अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 31 जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृतांना दोन लाखांची मदत जाहीर

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शाहजहानपूर घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत.