विचित्र लग्न: एक नवरदेव तीन वधू; एकाच मंडपात घेतले फेरे

नवरेदव आणि वधू असलेल्या तिन्ही तरूणी गेली अनेक वर्षे लिव्ह-ईन रिलेशनशिपमध्ये राहतात. 

Updated: Jun 23, 2018, 01:14 PM IST
विचित्र लग्न: एक नवरदेव तीन वधू; एकाच मंडपात घेतले फेरे title=

नवी दिल्ली: राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यात एक विचित्र लग्नसोहळा पहायला मिळाला. ज्या लग्नात एक वर तर तीन वधू होत्या. मोठ्या साजशृंगारांनी सजलेल्या तिन्ही वधूंनी एकाच नवरदेवासोबत मोठ्या उत्साहाने फेरे घेत आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या. विशेष म्हणजे हे लग्न एकाच मंडपाखाली एकाच वळी पार पडले. या विचित्र लग्नाची सध्या भलतीच चर्चा सुरू आहे.

नवरदेव आणि तिन्ही वधू लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये

या विवाह प्रकरणातील धक्कादायक माहिती अशी की, नवरेदव आणि वधू असलेल्या तिन्ही तरूणी गेली अनेक वर्षे लिव्ह-ईन रिलेशनशिपमध्ये राहतात. प्राप्त माहितीनुसार, ३३ वर्षीय नक्काल कसोटियाला बालपणी पोलिओ झाला होता. त्याची पहिली पत्नी त्याच्यापेक्षा १३ वर्षांनी मोठी आहे. तिच्यासोबत तो गेली १२ वर्षे लिव्ह इनमध्ये राहतो. दरम्यान, ८ वर्षांपूर्वी नक्कालाल गावातील पुनकी नामक मुलीवर त्याचे मन जडले. त्यामुळे तो तिलाही आपल्या घरी घेऊन आला. महत्त्वाचे असे की, पुनकीही दिव्यांग आहे. पण, दोघींसोबत राहुनही नक्काल कोसटियाचे मन भरले नाही. गेल्याच वर्षी रेखा नावच्या मुलीवर त्याला प्रेम जडले. त्यात रेखा गर्भवती राहिली. त्यामुळे त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आदिवसींमध्ये लिव्ह-इन सर्वसामान्य 

दरम्यान, मजेशीर गोष्ट अशी की, नक्कालची तीसरी पत्नी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची पहिली प्रेमिका आणि पत्नीची बहिणच आहे. बुधवारी एका मुहूर्तावर त्याने तिघींसोबत लग्न केले. अदिवासी असल्यामुळे त्याला एकाच वेळी अनेक लग्ने करण्यापासून कायदाही रोखू शकत नाही. दरम्यान, आदिवसींमध्ये लिव्ह इन हा प्रकार अगदी सर्वसामान्य गोष्ट आहे. नक्कालचे म्हटले आहे की, तिघींसोबत आपला संसार सुखाचा सुरू असून आपण त्यात खूश आहोत.