पती-पत्नीच्या भांडणानंतर एक वर्षाच्या चिमुरड्याला बापानंच चिरडलं

शेजारच्यांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केला

Updated: Jun 23, 2018, 12:39 PM IST
पती-पत्नीच्या भांडणानंतर एक वर्षाच्या चिमुरड्याला बापानंच चिरडलं title=

नवी दिल्ली : संभलच्या चंदौसी भागात नात्याला काळिमा फासणारी घटना घडलीय. पती - पत्नीच्या भांडणानंतर रागावर नियंत्रण न मिळवता आल्यानं या बापानं आपल्याच अवघ्या एका वर्षाच्या मुलाला चिरडून ठार केलं. मुलाच्या हत्येनंतर या इसमानं पळण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेजारी राहणाऱ्यांनी लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत कारवाई सुरू केलीय.  

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, जेवण बनवण्यावरून आरोपी पती अरशदचं आपल्या पत्नीसोबत भांडण झालं होतं... याच वादानंतर आरोपीला आपला राग अनावर झाला... आणि याच रागाच्या भरात अरशदनं जवळच झोपलेल्या अवघ्या एका वर्षाच्या निरागस मुलाच्या गळ्यावर पाय देऊन त्याचा जीव घेतला.

गोंधळाचा आवाज ऐकून शेजारी घरात दाखल झाले तेव्हा आरोपीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला... परंतु, त्याचा हा प्रयत्न फसला. शेजारच्यांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केला.