UPSC विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, आयोगाचा मोठा निर्णय

UPSC च्या विविध भरती परीक्षांची तयारी करणारे उमेदवार Google Play Store वर जाऊन त्यांच्या मोबाईलवर हे अॅप सहज डाउनलोड करू शकतात.    

पोपट पिटेकर | Updated: Sep 30, 2022, 11:22 PM IST
UPSC विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, आयोगाचा मोठा निर्णय title=

पोपट पिटेकर, झी मीडिया,मुंबई : दरवर्षी देशभरातून लाखो उमेदवार UPSC ची परीक्षा देतात. त्यांना युपीएससी विषयी माहिती शोधताना अनेक वेबसाईटचा वापर करावं लागत असं. परंतू त्यांचा सर्व त्रास आता वाचणार आहे.कारण युपीएसीकडून एक अॅप तयार करण्यात आलाय. हे अॅप तुम्हाला हवी असलेली सर्व माहिती यामध्ये उपलब्ध असेल. चला तर पाहूयात कोणतं आहे App आणि त्याचे वैशिष्ट्ये. (union public service comission launched its oficial app for student) 

संघ लोकसेवा आयोग UPSC कडून अधिकृत अॅप  UPSC Official App लाँच करण्यात आलं आहे.हे अॅप सध्या Android फोनमधील प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. UPSC च्या विविध भरती परीक्षांची तयारी करणारे उमेदवार Google Play Store वर जाऊन त्यांच्या मोबाईलवर हे अॅप सहज डाउनलोड करू शकतात. उमेदवार या अॅपद्वारे भरती अधिसूचना आणि परीक्षेचे तपशील प्राप्त करण्यास सक्षम असतील. या अॅपद्वारे उमेदवारांना त्यांचा निकालही पाहता येणार आहे. UPSC ची तयारी करणारे उमेदवार या अॅपद्वारे ऑनलाइन अर्ज भरू शकणार नाहीत.

UPSC या सर्व परीक्षा घेते

दरवर्षी केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा तसेच इतर अनेक भरती परीक्षा घेते. नागरी सेवा परीक्षेव्यतिरिक्त, UPSC NDA-N भर्ती परीक्षा, CDS, CAPF असिस्टंट कमांडंट भरती परीक्षा, भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षा, संयुक्त भू वैज्ञानिक परीक्षा, वन सेवा, IES आणि ISS आणि एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा इत्यादींचे आयोजन करते.

वन टाइम रजिस्ट्रेशन काय?

UPSC ने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी वन टाइम रजिस्ट्रेशन (OTR) प्लॅटफॉर्म सुरू केला होता. ज्या उमेदवारांना कोणत्याही UPSC परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी OTR प्लॅटफॉर्म upsconline.nic.in या वेबसाइटला भेट देऊन त्यांचे मूलभूत वैयक्तिक तपशील भरून स्वतःची नोंदणी करावी लागेल. उमेदवाराची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, त्याचे तपशील UPSC सर्व्हरमध्ये सुरक्षितपणे संग्रहित केले जातील. त्याच वेळी, उमेदवार कोणत्याही परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करेल तेव्हा, अर्ज करताना उमेदवाराचे मूलभूत तपशील आपोआप भरले जातील.