Pensioners | पेन्शनधारकांनो तुमच्यासाठी मोठी बातमी

 पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. 

Updated: Nov 30, 2021, 08:33 PM IST
Pensioners | पेन्शनधारकांनो तुमच्यासाठी मोठी बातमी  title=

अमर काणेसह, झी 24 तास, नागपूर : पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर पेन्शनधारक असाल तर तुम्हाला येत्या काळात हयात (जिवंत) असल्याचा दाखला देण्याची गरज नाही. त्यासाठी केंद्र सरकारनं एक वेगळी योजना आखलीय. पाहूयात काय आहे पेन्शनधारकांसाठी खास प्लान. (Union Minister of State Dr Jitendra Singh on Monday launched unique Face Recognition Technology for Pensioners) 

पेन्शनधारकांना दरवर्षी जिवंत असल्याचा म्हणजेच हयातीचा दाखला द्यावा लागतो. हा दाखला दिला नाही तर त्यांची पेन्शन बंद केली जाते. पण आता पेन्शनधारकांची या दाखल्याच्या झंझटीतून सुटका होणारंय. केंद्र सरकार लवकरच पेन्शनधारकांसाठी फेस रेकगनायझेशन सिस्टम ही हायटेक टेक्नोलॉजी आणणार आहे. 

टेक्नोलॉजी नुसार आता पेन्शधारकाचा चेहरा हाच जिवंत असल्याचा पुरावा असेल. राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांच्या हस्ते या नव्या तंत्रज्ञानाचं अनावरण करण्यात आलं. 

काय आहे फेस रेकग्नायझेशन टेक्नॉलॉजी? 

बँकेला लिखित स्वरूपात हयातीचा दाखला देण्याची गरज नाही. बँक अधिकारी मोबाईल अॅपद्वारे पेन्शनधारकाच्या चेह-यांची पडताळणी करतील. चेह-याचं स्कॅनिंग पूर्ण होताच संबंधित पेन्शनधारकाची अॅप्लिकेशनमध्ये नोंदणी होईल. हाच जिवंत असल्याचा डिजिटल पुरावा असेल. 

वयोमानामुळे अनेक पेन्शनधारकांना बँकेत जाता येत नाही, कागदपत्रांची पुर्तता करता येत नाही. त्यामुळे ही नवी टेक्नॉलॉजी पेन्शनधारकांसाठी उपयुक्त ठरेल अशी आशा करायला हरकत नाही.