Meenakshi Lekhi : वारंवार विनंती करूनही 'भारत माता की जय'चा न म्हटल्याने केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी केरळमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी शनिवारी केरळमधील कोझिकोड येथे झालेल्या युवा परिषदेत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी भारत माता की जयच्या घोषणा देत नसल्यामुळे उपस्थित प्रेक्षकांवर केंद्रीय मंत्री लेखी संतापल्या. त्यांनी एका मुलीला घोषणा देत नसल्यामुळे रागाने बाहेर जाण्यास सांगितले. यावेळी मिनाक्षी लेखी यांनी भारत तुमची माता नाही का असा सवाल देखील विचारला. या घटनेची आता देशभराता चर्चा सुरु आहे.
केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी शनिवारी केरळच्या कोझिकोड येथील युवा संमेलनात प्रेक्षकांच्या एका वर्गावर भारत माता की जयची घोषणा न दिल्याबद्दल त्यांना फटकारले. चिडलेल्या लेखी यांनी त्यांना विचारले की भारत त्यांची आई नाही का? त्यानंतर घोषणा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महिलेला स्थळ सोडून जाण्यास सांगितले. ही परिषद काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी आयोजित केली होती.
आपल्या भाषणाचा समारोप करताना, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी लेखी यांनी 'भारत माता की जय' अशी घोषणा दिली आणि प्रेक्षकांना त्याची पुनरावृत्ती करण्यास सांगितले. प्रेक्षकांकडून अपेक्षेप्रमाणे प्रतिक्रिया न मिळाल्याने लेखी यांनी भारत आपले घर नाही का, भारत तुमची माता नाही का असा प्रश्न केला. 'भारत ही फक्त माझीच आई आहे की तुमची आई नाही का? मला सांगा...काही शंका आहे का? शंका नाही ना? मग उत्साह व्यक्त करण्याची गरज आहे, असे मीनाक्षी लेखी यांनी म्हटलं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मीनाक्षी लेखी यांनी भारत माता की जयची घोषणा न देणाऱ्या तरुणांना फटकारले आणि ज्यांना याची लाज वाटते त्यांनी येथे यायला नको होते, असे म्हणताना दिसत आहेत. मीनाक्षी लेखी यांनी तरुणांना भारत माता की जय म्हणण्याचे आवाहन केले होते. कार्यक्रमाला उपस्थित लोकांकडून तिला चांगला प्रतिसाद न मिळाल्याने त्या संतप्त झाल्या.
त्यानंतर मंत्री मीनाक्षी लेखी पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेल्या मुलीकडे बोट दाखवत म्हणतात की, जर तिला भारत माता की जय म्हणायला लाज वाटत असेल तर तिने कार्यक्रम सोडावा. मी तुम्हाला थेट प्रश्न विचारते, भारत तुमची आई नाही का?, असेही लेखी म्हणाल्या. 'पिवळ्या पोषाखातली मुलगी उभी राहू शकते. बाजूला पाहू नको. मी तुझ्याशी बोलणार आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. थेट प्रश्न. भारत तुमची आई नाही?...अशी वृत्ती का? असेही लेखी म्हणताना दिसत आहेत.
Meenakshi Lekhi publicly humiliated some people including a woman for not responding to her 'Bharat Mata' chants in Kerala. 'Bharat Mata ki Jai' is a Hindi slogan. In Kerala, people hardly know Hindi. This humiliation is a kind of imposition.pic.twitter.com/Qvdfvbiw3Q
— Waquar Hasan (@WaqarHasan1231) February 3, 2024
दरम्यान, मंत्री लेखी यांनी पुन्हा भारत माता की जयची घोषणा दिली, पण ती मुलगी तशीच उभी होती. ज्याला देशाचा अभिमान नाही आणि ज्याला भारताबद्दल बोलणे लज्जास्पद वाटते अशा व्यक्तीने युवा परिषदेचा भाग असण्याची गरज नाही, असेही लेखी यांनी स्पष्ट केले.