मुंबई : केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं धक्कादायक वक्तव्य.
ANI ने आयोजित केलेल्या India Infracon 2018 या चर्चासत्रात मंगळवारी धर्मेंद्र प्रधान सहभागी झाले होते. यावेळी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान हे सतत पाकिस्तानच्या भारत विरूद्ध धोरणांबाबत बोलत होते. सीमेवर होत असलेल्या कारवायांवर आपली मत मांडत होते.
यावेळी बोलण्याच्या ओघात मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पाकिस्तान विरूद्ध वक्तव्य केलं. त्यांनी पाकिस्तान हा देश अगदी छोटा देश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
#WATCH: Union Minister Dharmendra Pradhan says 'Pakistan ek chhutputiya desh hai' (13.02.2018) #ANIInfracon pic.twitter.com/BQpAMW9xq9
— ANI (@ANI) February 14, 2018
#WATCH: Union Minister Dharmendra Pradhan says 'Bharat ke saath sab energy producer achha rishta rakhna chahte hain' (13.02.2018) #ANIInfracon pic.twitter.com/hk0YIK7lsO
— ANI (@ANI) February 14, 2018
ते म्हणाले की, पाकिस्तान हे अतिशय छोटा देश आहे. पाकिस्तान असो की चीन या दोन्ही देशांना उत्तर देण्यास आपलं सैन्य सक्षम आहे. पुढे ते म्हणाले की, पाकिस्तानचं कोणत्याच देशासोबत मैत्रीचं नातं नाही. आणि पाकिस्तान हा असा देश आहे की तो त्यासाठी तेवढा लायक देखील नाही.