केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरु होते.

Updated: Oct 8, 2020, 09:11 PM IST
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन title=

नवी दिल्ली : भारतीय राजकारणातील एक मोठे नेते केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं आज निधन झालं. बिहारच्या राजकारणातून ते देशाच्या राजकारणात गेले. सध्या मोदी सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री देखील होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण अखेर त्यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रामविलास पासवान यांचा मुलगा आणि एलजेपी नेते चिराग पासवान यांनी ट्विट करत त्यांच्या निधनाची माहिती दिली. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यावर दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीचं त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली होती.

रामविलास पासवान हे देशातील एक अनुभवी नेते होते. 5 दशकाहून अधिक त्यांच्याकडे राजकारणाचा अनुभव होता. 9 वेळा ते लोकसभा आणि 2 वेळा राज्यसभा खासदार राहिले आहेत. बिहारमध्ये त्यांनी आपल्या पक्षाला मोठं केलं. ज्यामुळे त्यांचा दबदबा भारतीय राजकारणात देखील तितकाच होता.