रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

दिवाळीपूर्वी यंदाही केंद्र सरकारतर्फे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 20, 2017, 04:23 PM IST
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी title=
File Photo

नवी दिल्ली : दिवाळीपूर्वी यंदाही केंद्र सरकारतर्फे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार यंदाच्या वर्षीही दसरा आणि दिवाळीपूर्वी खूशखबर देण्याच्या तयारीत आहे. जर तुम्ही रेल्वेमध्ये नोकरी करत आहात किंवा तुमच्या परिवारातील एखादी व्यक्ती रेल्वेत नोकरी करत असेल तर तुम्ही सणासुदीच्या काळात चांगली शॉपिंग करु शकता.

रेल्वेला मिळालेल्या उत्पादनातून ७८ दिवसांचा बोनस कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार गिफ्ट म्हणून देऊ शकते. केंद्रीय मंत्रिमंडळाची यासंबंधी बैठक होणार असून या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे तब्बल १२.५८ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत या प्रस्तावर निर्णय घेण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात हा बोनस देण्याच्या निर्णयावर घेतला जाऊ शकतो.

जर केंद्र सरकारने हा प्रस्ताव मान्य केला तर कर्मचाऱ्यांना जवळपास ९००० रुपये बोनस मिळू शकतो. या निर्णयामुळे रेल्वे मंत्रालयावर १००० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोझा पडू शकतो.