New Tax Regime Changes in Union Budget 2023: Tax पेयर्ससाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली. (Income tax slab) या अर्थसंकल्पातून नोकरी व्यवसायाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. पण अर्थमंत्र्यांनी करदात्यांसाठी केलेली घोषणा थोडी किचकट आहे. आता 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. मात्र प्रत्यक्षात हा बदल नव्या करप्रणालीत करण्यात आला आहे. जुन्या कर प्रणालीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. Budget 2023 Updates : मोदी 2.0 सरकारच्या पूर्ण अर्थसंकल्पात या महत्वाच्या घोषणा
जर तुम्ही आधीच जुन्या कर प्रणाली अंतर्गत आयकर सवलतीचा दावा केला असेल, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे फायदा झालेला नाही. परंतु जर तुम्ही नवीन कर प्रणाली अंतर्गत आर्थिक वर्ष 2022 पर्यंत दावा केला असेल तर तुम्हाला थेट लाभ मिळेल. म्हणजेच या करप्रणालीचा फायदा जास्त पगार असलेल्यांना होणार आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सांगितले की, आता डीफॉल्ट नवीन कर व्यवस्था कायम राहील. वास्तविक, नवीन कर प्रणालीचा सरकारकडून सातत्याने प्रचार केला जात आहे, ज्या अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. New vs Old Income Tax Regime : नवीन आणि जुन्या करप्रणातील नेमका काय फरक, जाणून घ्या फायदे - तोटे
जर तुम्ही बॉय डिफॉल्ट नवीन कर प्रणाली निवडली असेल तर ते तुमच्या खिशाला भारी पडेल आणि तुम्हाला त्यानुसार कर भरावा लागेल. तुम्ही नवीन कर प्रणालीमध्ये कोणत्याही प्रकारच्या कर सवलतीचा दावा करु शकत नाही. तर जुन्या कर प्रणालीमध्ये, 80C आणि NPS अंतर्गत 2 लाख रुपये, गृहकर्जाच्या व्याजावर 2 लाख रुपये, 80D अंतर्गत 25,000 रुपयांचा वैद्यकीय विमा आणि 5,000 रुपयांची तपासणी असा दावा केला जाऊ शकतो.
याशिवाय तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी 50 हजारांपर्यंतच्या वैद्यकीय विमा प्रीमियमचा दावा करु शकता. याशिवाय यामध्ये 50 हजार रुपयांची स्टँडर्ड डिडक्शनही मिळते. म्हणजेच यामध्ये तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.
नवीन कर प्रणाली निवडण्याचा फायदा फक्त काही लोकांनाच होईल ज्यांचे वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपयांपर्यंत आहे. याच्यावर गेल्यावर तुम्हाला कर भरावा लागेल. म्हणजेच, जर तुम्ही स्वत:चे घर घेतले असेल आणि बचत योजनेत गुंतवणूक केली असेल, तर जुनी व्यवस्था तुमच्यासाठी अजूनही फायदेशीर आहे. 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. पण जर तुमचे उत्पन्न 7 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तीन लाख रुपयांपर्यंत कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. तीन ते सहा लाखांपर्यंत तुम्हाला 5 टक्के कर भरावा लागेल आणि 6 ते 9 लाखांपर्यंत तुम्हाला 10 टक्के कर भरावा लागेल.
0 ते 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नसेल
3 ते 6 लाखांपर्यंतचे उत्पन्न - 5% कर,
6 लाख ते 9 लाखांपर्यंतचे उत्पन्न - 10% कर
9 लाख ते 12 लाखवर -15 % कर
12 लाख ते 15 लाखावर - 20% कर
15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30% कर
2.5 लाखापर्यंत शून्य टॅक्स
2.5 लाख ते 5 लाख उत्पन्नावर -5 % टॅक्स
5 लाख ते 10 लाख उत्पन्नावर - 20 % टॅक्स
10 लाख ते 20 लाख उत्पन्नावर -30 % टॅक्स
20 लाखा पेक्षा जास्त उत्पन्नावर -30 % टॅक्स
अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, यावेळी जेव्हा तुम्ही आयकर वेबसाइटद्वारे आयकर भराल तेव्हा तुम्हाला जुन्या आणि नवीन कर प्रणालीमधून निवडलेली बॉय डिफॉल्ट नवीन व्यवस्था मिळेल. पूर्वी, जुन्या करप्रणातील डीफॉल्टनुसार निवडला जात असे. येथे तुम्हाला कर व्यवस्था निवडताना काळजी घ्यावी लागेल. जर तुमचे उत्पन्न 7 लाखांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला जुनी कर व्यवस्था चालू ठेवावी लागेल. जर तुम्ही येथे निवडलेली नवीन कर व्यवस्था सोडली असेल, तर तुम्हाला ते भारी पडेल आणि कर भरावा लागेल, त्यामुळे करप्रणालीची निवड करताना तुम्ही काळजी घ्या.