Trending News: मालदीव, बाली आणि इंडोनेशिया हा देश भारतीय पर्यटकांना आकर्षित करत असतो. या देशातील सौंदर्य आणि नयररम्य दृष्य पाहून आपल्याला इथे जाण्याचा मोह आवरत नाही. सेलिब्रिटी मालदीवला निसर्गाची जादू अनुभवायला जातात. मालदीव हा जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का भारतात पण असं ठिकाण आहे, ज्यापुढे मालदिवचं सौंदर्यसुद्धा फिक पडेल. भारतातील या ठिकाणचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की हे भारत आहे की परदेशातील एखादं ठिकाण आहे.
भारतातील हे सुंदर आणि नयनरम्य ठिकाण आहे कर्नाटकातील उडुपी इथे. सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल होता आहे ते उडुपीचा समुद्रकिनारा आहे. या ठिकाणी सुंदर अशा निसर्गाच्या सान्निध्यात सुमद्राच्या किनाऱ्यालगत सायकलिंगचा रस्ता तयार केला आहे. या सायकलिंगचा रस्ता सोशल मीडियावर एरिक सोल्हेम नावाच्या युजरने शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी एक कॅप्शनसुद्धा दिलं आहे, ''अतुल्य भारत! जगातील सर्वात सुंदर सायकलिंग मार्ग. उडुपी, कर्नाटक. कृपया मला त्या बीचवर सायकल चालवायची आहे.''
एरिक सोल्हेम हे ग्रीन बेल्ट अँड रोड संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते सोशल मीडियावर जगातील सुंदर सुंदर दृष्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. उडुपीचा हा सायकलिंगचा रस्त्याच्या फोटोला साडेतीन हजारांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे. तर हे फोटो 330 हून अधिक यूजर्सने रिट्विट केले आहे. तसंच कमेंट सेक्शनमध्येही लोकांना या जागचं भरभरून कौतुक केलं आहे. ''हे खरोखरच खूप सुंदर आहे'', असं म्हणतं आहे तर कोणी म्हणतं आहे की, ''वाह वाह वाह...मी लवकरच येथे सायकल चालवायला जाणार आहे.'' तर एक यूजर म्हणतो की, ''वाह एकदम अप्रतिम.''
Incredible India
World's Most Beautiful Cycling Route
Udupi, Karnataka.
I wish to bike down that beach, please! @VisitUdupi pic.twitter.com/VWQZPN2YS0— Erik Solheim (@ErikSolheim) July 29, 2022