पाकिस्तानविरोधात गुरगुरणाऱ्यांची चीनविरुद्ध शेळी का होते? China च्या घुसखोरीवरून ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांना सवाल

India China News : सरकार निवडणुकीच्या प्रचाराचत मशगूल असतानाच तिथं चीननं देशाच्या सीमाभागात घुसखोरी करत केलेल्या कारवाया सामना अग्रलेखातून अधोरेखित करत ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.   

सायली पाटील | Updated: Jun 1, 2024, 10:15 AM IST
पाकिस्तानविरोधात गुरगुरणाऱ्यांची चीनविरुद्ध शेळी का होते? China च्या घुसखोरीवरून ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांना सवाल title=
uddhav thackeray group samana slams pm modi and govt stand over china deploying fighter jets at indian border

India China News : भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये असणारं तणावाचं वातावरण काही केल्या कमी होत नसून उलटपक्षी दर दिवशी या तणावात आणखी भर पडतान दिसत आहे. या साऱ्यामध्ये सत्ताधाऱ्यांचं लक्ष मात्र देशात सुरु असणाऱ्या (Loksabha election 2024) लोकसभा निवडणुकीवर असून, त्यांच्या याच भूमिकेवर लक्ष्य साधत (Shivsena thackeray group) शिवसेनेच्या ठाकरे गटानं शाब्दिक तोफ डागली आहे. याच धर्तीवर 'सामना' या मुखपत्राच्या माध्यमातून अग्रलेख लिहिताना ठाकरे गटानं मोदी सरकारला खडा सवाल केला आहे. पाकिस्तानविरोधात गुरगुरणाऱ्यांची चीनविरुद्ध शेळी का होते? असं विचारताना त्यांच्या कन्याकुमारीतील ध्यानसाधनेवरही कटाक्ष टाकल्याचं अग्रलेखातून स्पष्ट होतंय. 

ठाकरे गटाचं म्हणणं तरी काय?

जेव्हाजेव्हा पाकिस्तानला इशारा देण्याची वेळ येते तेव्हातेव्हगा मोदींची छाती फुगते. मात्र चीनला इशारा देण्याची वेळ आली की, ती तेवढीच आत का जाते? असा खडा सवाल ठाकरे गटानं केला. चीनकडून भारतीय सीमा ओलांडून अरुणाचल प्रदेशातील सीमाभागात आतापर्यंत जवळपास 600 गावं वसवण्यात आली आहेत. 30 घरांहून कमी संख्या असणारी ही शेकडो गावं सध्या भारतीय सीमाभागात असून, त्यांचा वापर पर्यटनाच्या हेतूनं नव्हे, तर लष्करी कारवायांसाठी केला जाण्याचीच शक्यता असल्याचं स्पष्ट मत ठाकरे गटानं मांडलं आहे. 

चीननं उभारलेल्या या कृत्रिम गावांमध्ये लष्कराच्या दृष्टीनं सुसज्ज असणाऱ्या यंत्रणा पाहता भारताविरोधातील कारवाईसाठी इथं कटकारस्थानं रचली जात असतानाच सरकारनं मात्र मौन बाळगलं आहे, अशा शब्दांत ठाकरे गटानं संताप व्यक्त केला. अरुणाचल प्रदेशत नव्हे, तर लडाखमध्येही हीच परिस्थिती असताना चीनकडून वसवण्यात आलेल्या गावांना चीनी, तिबेटन आणि रोमन भाषेतील नावंही देण्यात आली आहेत. यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून मात्र ‘चीनने फक्त नावेच बदलली. मी तुमच्या घराचे नाव बदलले तर ते आमचे होईल का?’ अशा आशयाचे प्रश्न उपस्थित करण्याच आल्याची बाब प्रकाशझोतात आणत महत्त्वाचे विषय दुर्लक्षित राहत असल्यामुळं तीव्र शब्दांत निराशेचा सूर आळवण्यात आला आहे. 

हेसुद्धा वाचा : 'ते लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस स्टेशनला गेले...', पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांकडून सुनील टिंगरेंची पाठराखण

 

चीनच्या घुसखोरीपासून मणिपूर हिंसाचार, जम्मू काश्मीरच्या सीमेलगत असणारी अशांतता, पाकिस्तानला मिळणारा चीनचा सशस्त्र पाठींबा या सर्व गोष्टींच्या बाबतीत सत्ताधाऱ्यांची डोळेझाक का होत आहे, असाच थेट प्रश्न ठाकरे गटानं विचारला आहे. चिनी कारवायांची सत्र छातीठोकपणे सुरु असतानाच, देश असुरक्षित असताना पंतप्रधानांना मात्र जाग येत नसून ते मात्र कन्याकुमारीत ध्यानमग्न आहेत. पण, सध्या मात्र जनतेला शेजारी राष्ट्रांच्या कारवायांवर लक्ष ठेवणारे राज्यकर्ते हवे असून, ध्यानमग्न असणाऱ्यांनी आतातारी जागं व्हावं अशी संतप्त हाक ठाकरे गटानं मारल्याचं पाहायला मिळत आहे.