वेळेत कॅब आली नाही म्हणून विमान चुकलं; उबर कंपनीला ग्राहकाला द्यावे लागणार 54 हजार

एका व्यक्तीने उबेर बुक केली पण कॅब वेळेत न आल्यामुळे चक्क त्याची फ्लाइटच चुकली. कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे त्याव्यक्तीला चक्क 54000 रुपये दंड द्यावा लागणार आहे. कंपनी त्या ग्राहकाचा फोन देखील होत उचलत नसल्याच सांगितलं जात आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 5, 2024, 05:10 PM IST
वेळेत कॅब आली नाही म्हणून विमान चुकलं; उबर कंपनीला ग्राहकाला द्यावे लागणार 54 हजार  title=

Uber Cab: अनेकदा वेळेत पोहोचण्यासाठी आपण डायरेक्ट उबर कॅब करणं पसंत करतो. पण कॅब ड्रायव्हर किंवा कॅब सर्विस देणाऱ्या कंपनीमुळे ग्राहक वेळेत पोहोचू शकत नाही. अशावेळी अनेकदा कामावर पोहोचण्यात उशीर होतो किंवा कामाच्या ठिकाणी मनःस्थीति बिघडते. पण अनेक ग्राहक या परिस्थितीवर चिडचिड करुन सोडून देतात. पण या प्रकरणात उबरला चक्क 54000 रुपयांचा सामना करवा लागणार आहे. 

दिल्ली ग्राहक विवाद निवारण आयोगाने जिल्हा आयोगाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. ज्यामध्ये कॅब सर्व्हिस एग्रीगेटर उबेरला तक्रारदाराला वेळेवर कॅब न दिल्याबद्दल आणि खराब सेवेसाठी नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. ऑक्टोबर 2023 मध्ये, जिल्हा आयोगाने कंपनीला तक्रारदाराला ₹24,100 नुकसानभरपाई आणि मानसिक त्रास आणि कायदेशीर खर्चासाठी ₹30,000 देण्याचे आदेश दिले.

ही घटना नोव्हेंबर 2022 मध्ये घडली होती. जेव्हा तक्रारदार उपेंद्र सिंह यांनी उबेरची कॅब वेळेवर न मिळाल्याने त्यांची इंदूरला जाणारी फ्लाइट चुकवली होती. अहवालात असे म्हटले आहे की, उपेंद्र सिंह यांनी दिल्ली विमानतळावर पोहोचण्यासाठी पहाटे 3.15 वाजता कॅब बुक केली परंतु ना कॅब आली ना कंपनीने त्यांच्या अनेक कॉलला प्रतिसाद दिला. उशीर झाल्यामुळे उपेंद्र सिंह आणि त्यांच्या पत्नीला लोकल टॅक्सी भाड्याने घ्यावी लागली. त्यामुळे ते पहाटे 5:15 वाजता विमानतळावर पोहोचले आणि तोपर्यंत त्यांचे इंदूरला जाणारे विमान चुकले होते.

असे सांगितले जात आहे की, उपेंद्र सिंह यांना दिल्लीला परत येण्यासाठी आधीच बुक केले होते. त्यामुळे हे जोडपे इंदूरमध्ये त्यांच्या कुटुंबासह 12 तासांपेक्षा कमी वेळ घालवू शकले. उपेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने कधीही त्यांच्या कॉलला प्रतिसाद दिला नाही. हे प्रकरण इथेच संपले नाही, 23 नोव्हेंबर 2021 रोजी कंपनीला पाठवलेल्या कायदेशीर नोटीसलाही प्रतिसाद दिला गेला नाही. कंपनीच्या या वृत्तीला कंटाळून सिंग यांनी दिल्ली जिल्हा आयोगाकडे तक्रार केली.

राज्य आयोगाच्या खंडपीठाने दिल्ली जिल्हा आयोगाचा आदेश कायम ठेवला आणि उबेर वेळेवर सेवा प्रदान करण्यात अयशस्वी झाल्याचे सांगितले. कंपनीने ना पुरावे सादर केले ना योग्य उत्तर दिले. खंडपीठाच्या 11 नोव्हेंबरच्या आदेशाचा दाखला देत, अहवालात म्हटले आहे की, 'वाहतूक प्रक्रिया सुलभ करणारे सेवा प्रदाता म्हणून, ग्राहकाची (Uber) जबाबदारी आहे की सेवा कोणत्याही विलंब किंवा गैरसोयीशिवाय दिल्या जातील.