पंतप्रधान मोदी युएईच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातचा सर्वोच्च सन्मान असणाऱ्या झायेद पदकानं गौरविण्यात आलयं.

Updated: Apr 4, 2019, 04:09 PM IST
पंतप्रधान मोदी युएईच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित  title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातचा सर्वोच्च सन्मान असणाऱ्या झायेद पदकानं गौरविण्यात आलयं... संयुक्त अरब अमिरात आणि भारत यांच्यातले संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गौरव करण्यात आलायं... संयुक्त अरब अमिरातचे अध्यक्ष शेख खलिफा यांच्या हस्ते झायेद पदक देऊन पंतप्रधानांचा गौरव करण्यात आला..
 

Image result for pm modi happy zee news

 युएईचा हा सन्मान पी-5 देशांच्या राष्ट्राध्याक्षकांना मिळाला आहे. आता पंतप्रधान मोदींचे नाव या यादीत आले आहे. हा सन्मान दोन्ही देशांमधील नाते मजबूत करण्यास मदत करणारा आहे. यूएई आणि भारताची भागीदारी व्यापारासारख्या अनेक क्षेत्रात वाढत चालली आहे. 

 याआधी फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान मोदींना सियोल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधानांना 'एक्ट ईस्ट' निती आणि विकासोन्मुख कार्यांसाठी हा सन्मान देण्यात आला.

Image result for pm modi happy zee news

हा पुरस्कार म्हणजे 130 कोटी भारतीयांचा सन्मान असल्याचे मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदीं आधी हा पुरस्कार संयुक्त राष्ट्राच्या माजी महासचिव कोफी अन्नान आणि बान की-मून यांना देखील मिळाला आहे.