मुंबई : देशात दोन हजाराच्या चलनाची संख्या व्यवहारातून कमी होत आहे. त्यात दोन हजारांच्या नोटांची छपाई पूर्णत: थांबविल्याने दोन हजारांच्या नोटा बंद होतील की काय? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा जोर धरू लागलीय. त्यात दोन हजारांच्या कोट्यवधी बनावट नोटा विविध राज्यात पोलिसांच्या छाप्यात सापडत आहेत. या नोटांचे चुकीचे रंग, उडणारे पुसट रंग आणि नोटा छापण्यातही मोठ्या चुका होत्या. 'झी २४ तास'नं रंगातील फोलपणा उघड केला होता.
देशाचं सर्वात महागडं चलन नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये न छापता आरबीआयच्या नवीन प्रेसमध्ये छापण्यात आलं. याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. त्यामुळे नोटा न छापण्या मागची कारणे काय काय हे सरकारनं स्पष्ट करणं गरजेचं आहे...
- दोन हजारच्या नोटा का बंद केल्या?
- या नोटा न छापण्याची कारणे गुलदस्त्यात का ठेवण्यात आली?
- साधर्म्य असलेल्या बनावट नोटा बाजारात कशा आल्या?
- आरबीआयच्या प्रेसमध्ये नोटाच मूळ छापा असताना तंतोतंत जुळणाऱ्या बनावट नोटा बाजारात कशा आल्या?