भारत सरकार ऍक्शनमोडमध्ये आल्याने, नवीन IT नियमांवर ट्विटरने दिले हे उत्तर

 नवीन आयटी नियमांबाबत भारत सरकार आणि सोशलमीडियावरील कंपन्यांमधील वाद अद्याप थांबलेला नाही.

Updated: May 27, 2021, 02:53 PM IST
भारत सरकार ऍक्शनमोडमध्ये आल्याने, नवीन IT नियमांवर ट्विटरने दिले हे उत्तर title=
representative image

नवी दिल्ली : नवीन आयटी नियमांबाबत भारत सरकार आणि सोशलमीडियावरील कंपन्यांमधील वाद अद्याप थांबलेला नाही. या दरम्यान ट्विटरने आपले म्हणणे जारी केले आहे. भारत सरकारसह यासंबधी चर्चा सुरू ठेऊ, असे ट्विटर इंडियाने म्हटले आहे.

भारतात कायद्याचे पालन करण्याचा प्रयत्न करू
ट्विटर इंडियाने आपले म्हणणे जारी केले आहे. लोकांप्रती आमचे उत्तरदायीत्व आहे. आमची सेवा सार्वजनिक चर्चेसाठी महत्वपूर्ण ठरेल. आम्ही महामारी दरम्यान लोकांना सपोर्ट केला आहे. आमची सेवा सुरू ठेवण्यासाठी भारतात लागू असलेला कायदा पाळण्याचा पूर्ण प्रयत्न करू

अभिव्यक्तीची स्वातंत्रता आणि गोपनीयतेसाठी कायद्याचे पालन
ट्विटरने म्हटले आहे की, जसे आम्ही जगभरात करतो. तसे पारदर्शी तत्व, सेवेमध्ये तुमचा आवाज मजबूत करण्याची जबाबदारी, कायद्यांप्रती अभिव्यक्तीची स्वातंत्र्यता आणि गोपनीयतेच्या संरक्षणासाठी नियमांचे पालन करू.

भारत सरकारसोबत चर्चा सुरू
आम्ही विविध नियम आणि त्यांच्या तत्वांमध्ये बदल करण्याबाबत मागणी करीत आहोत. तरी भारत सरकारसोबत याविषयी चर्चा सुरू राहणार आहे. सरकारसह सहकार्याच्या दृष्टीकोनातून चर्चा सुरू ठेऊ. जनतेच्या हिताचे संरक्षण करणे प्रशासन, उद्योग आणि नागरी समाजाची सामुहिक जबाबदारी आहे. असेही ट्विटरने म्हटले आहे.